रायगड जिल्यातील रसायनीत महिला मेळवा 

लक्ष्मण डुबे
बुधवार, 24 जानेवारी 2018

रसायनी (रायगड) : चांभार्ली ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या आवारात नुकताच महिला मेळावा व सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे दिडशे महिला सहभागी झाल्या होत्या 

यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापति उमा मुंढे, खालापुर तालुका पंचायत समिति सदस्या कांचन पारंगे, व वृषाली पाटील, सरपंच विनया मुंढे, माजी सरपंच दिव्या जांभळे, वृषाली म्हात्रे, डॉ प्रतिभा महिंद्रकर आदि उपस्थित होते. 

यावेळी महिलासाठी हळदीकुंकु सभारंभ झाला. शिवाय संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा आदि स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच डॉ. प्रतिभा महिंद्रकर यांनी महिलांचे आधिकार, आरोग्याची काळजी, लेक वाचवा या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला चांभार्ली गावातील त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या हाद्दीतील कांबा, वात गावातील दिडशे पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. 

Web Title: Marathi news rasayani news mahila melawa