सावंतवाडीतील रस्ते होणार खड्डेमुक्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सावंतवाडी - गेली अनेक वर्षे डागडुजी तसेच डांबरीकरणापासून दुर राहीलेले अती वापराचे रस्ते आता खड्डेमुक्त होणार आहेत. त्याबाबतचे नियोजन करण्यासाठी कोअर नेटवर्क तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व्हेक्षण प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील अनेक रस्त्याची कामे होणार आहेत, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव राजीव गायकवाड यांनी आज येथे केला. 

राज्याचे बांधकाम मंत्री जिल्हा दौरावर येणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील रस्त्यासह अन्य विकास कामाबाबत श्री देशपांडे यांनी आज येथे पर्णकुटी विश्रामगृहावर बैठक घेवून आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे, उपकार्यकारी अभियंता प्रदिप व्हटकर, अनामिका चव्हाण, अनिल आवटी, राजन चव्हाण, अनिल पाटील, विनय पुलके, प्रसाद चव्हाण, विनायक जोशी, आदी अधिकारी उपस्थित होते त्यानंतर पत्रकारांना गायकवाड यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, अनेक वर्षे दुर्लक्षित राहीलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या राज्यातील रस्त्याचे ऑडीट सुरु आहे. आता हे रस्ते वापर लक्षात घेवून ज्या ठिकाणी गरज आहे. त्या ठिकाणी तात्काळ दुरुस्त करुन घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोअर नेटवर्क हा कार्यक्रम आखण्यात आला आहे त्यात ज्या नाबार्ड, सीआरएस रस्त्यावर ट्राफीक जास्त आहे. परंतू ते खराब झाले आहेत. अशा रस्त्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देवून ते सुधारण्यात येणार आहे. यात आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व रस्त्याचा विचार करण्यात आला. अधिकार्‍यांनी केलेल्या सुचनेनुसार कोणत्या ठिकाणचे रस्ते घ्यावेत. याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसात घेण्यात येणार. त्यानुसार ते रस्ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी किती निधी लागले, कोणत्या रस्त्याचा प्राधान्याने विचार करावा, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. असे श्री गायकवाड यांनी सांगितले. 

Web Title: marathi news sawantvadi kokan road hole