समुद्र किनाऱ्यांचा सायकलने प्रवास...

Marathi news Seaside bicycle travel Abhishek Narvekar
Marathi news Seaside bicycle travel Abhishek Narvekar

सावंतवाडी - आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन रेकॉर्ड केला आहे. ६७८० किलोमीटरचा सागरी महामार्ग नार्वेकर यांनी सायकलने पार केला. एकूण नऊ राज्यातील समुद्र किनाऱ्याजवळून ७२ दिवसांत त्याने हा टप्पा पार केला. दिव दमन, पाँडेचेरी, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा व पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमधून त्यांनी प्रवास केला. यावेळी त्याला तब्बल तीन हजार किलोमीटर प्रवासामध्ये वादळवारा. पाऊस यांचा सामना करावा लागला तरीही न डगमगता अभिषेकने हा टप्पा पार केला.

अभिषेक यांनी सावंतवाडी येथील आपले शिक्षण पूर्ण करून सध्या पुणे येथील एका पर्यटनाशी निगडित असलेल्या कंपनीमध्ये काम करतात. हे काम करत असताना त्याने यापूर्वीही मनाली ते श्रीनगर हा १०६५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक मोहिमा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. त्यात या समुद्री मार्गाचाही समावेश होता. यापूर्वी अशाप्रकारे कोणी ही मोहीम केली नसल्याने त्यांनी ही मोहीम करण्याचे ठरवले व 72 दिवसांत पूर्णही केली. नार्वेकर यांनी अथक परिश्रम घेतले व खडतर प्रवासातून ही मोहीम पूर्ण केली. यावेळी त्यांनी रोज 35 किलोमीटर सायकल चालवून सरावही केला होता. 7 सप्टेंबरला लखपत गुजरात येथून सुरूच शंभर किलोमीटर सायकल चालवत त्यांनी हा टप्पा पार केला. 
   
खराब रस्ते, खराब हवामान या सर्वांवर मात करत अभिषेकने ही मोहीम यशस्वीरीत्या पार केली. स्वच्छतेचा संदेश देत अभिषेक ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी अभिषेकचे स्वागत करण्यात आले. तर अभिषेकने या मोहिमेची आठवण म्हणून ९ राज्यातील प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावरील वाळू आठवण म्हणून सोबत आणली. यावेळी अभिषेकने यापुढील मोहीम ही संपूर्ण युरोप सायकलने फिरण्याची इच्छा असल्याचे सांगितले. अभिषेकने केलेल्या कामगिरीचे सिंधुदुर्गातून तसेच महाराष्ट्रभरातून कौतुक होत असून त्यांच्या पुढच्या वाटचालीस सिंधुदुर्गवासीयांनी शुभेच्छा दिेल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com