श्रीवर्धनमध्ये सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा अभियान

अमित गवळे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पाली : श्रीवर्धन तालुक्यातील रा. पा. दिवेकर, दांडगुरी हायस्कुलमध्ये बुधवारी (ता. 24) सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा अभियाना अंतर्गत तालुका स्तरीय सन्मान उत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील निवडक पालक आणि विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 या सन्मान कार्यक्रमात तालुक्यातील स्थलांतर होणाऱ्या पालकांसोबत स्थलांतर न झालेल्या, शंभर टक्के उपस्थिती असलेल्या व अतिशय कठीण परिस्थीतीत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती व वंचित समाजातील 14 ते 16 वयोगटातील किशोरवयीन मुलामूलींचा सन्मान करण्यात आला. तसेच फक्त मुली असलेल्या पालकांचा आणि स्थलांतर थांबलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमास तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून संजय जाधव होते.त्यांनी वंचित घटकातील मुलींच्या शिक्षणातील अडचणी, बालविवाह, शारीरिक बदल आदी समस्या सांगून त्यावर उपाय सुचविले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्रीवर्धन तालुका गटविकास अधिकारी विद्या गमरे, श्रीवर्धन तालुका गटशिक्षणाधिकारी नूरमहम्मद राऊत, स्थानिक शाळा समिती सभापती प्रविण पवार, दांडगूरी हायस्कुलचे मुख्याध्यापक नारायण अर्जुन, केंद्र प्रमुख भिकू पांगारकर, तालुका समन्वयक शुभदा सावंत आदी मान्यवरांसह शिक्षक वृंद, विदयार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन व सुत्रसंचालन गणेश सावंत तर प्रास्ताविक भिकू पांगारकर यांनी केले. या कार्यक्रमात तालुक्यातील 312, विदयार्थी, 21 शिक्षक, 17 पालक यांच्यासह 9 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.

Web Title: Marathi news shriwardhan news