सोशल मिडीयाद्वारे 'एक संघर्ष समाजसेवेसाठी' 

अमित गवळे 
सोमवार, 15 जानेवारी 2018

पाली (जि. रायगड) - अापल्या गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनीधी व प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच या समस्या लोकसहभागातून सोडविण्यासाठी पालीतील होतकरु तरुण व सुज्ञ नागरीक पुढे सरसावले आहेत. त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन व्हाॅट्सअपवर 'एक संघर्ष समाजसेवेसाठी' हा गृप तयार केला आहे. त्याद्वारे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहण्याचा निर्धार केला.

पाली (जि. रायगड) - अापल्या गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनीधी व प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच या समस्या लोकसहभागातून सोडविण्यासाठी पालीतील होतकरु तरुण व सुज्ञ नागरीक पुढे सरसावले आहेत. त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन व्हाॅट्सअपवर 'एक संघर्ष समाजसेवेसाठी' हा गृप तयार केला आहे. त्याद्वारे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहण्याचा निर्धार केला.

अवघ्या पाच ते सहा दिवसांपुर्वी पालीतील काही तरूण फेसबुकच्या माध्यमातून एकत्र अाले. त्यांनी गावातील विविध समस्यांवर बोट ठेवले अाणि या समस्यांवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला. सुरवातीला येथील मधल्या अाळितील तलावात असलेल्या घाणीचा प्रश्न ऐरणीवर घेतला. परिणामतः अवघ्या एक दिवसानंतर लगेच ग्रामपंचायतीला जाग येऊन हे तळे साफ करण्यात आले. सोशल मिडीयाद्वारे अशाप्रकारे अापल्या समस्या व मागण्यांकडे लक्ष वेधल्यास त्याची पुर्तता होते. हे त्यांच्या लक्षात आले. तसेच एकमेकांना साद दिल्यास अापणही स्वतः विविध समस्या मार्गी लावूयात या विचाराने 'एक संघर्ष समाजसेवेसाठी' हा व्हाॅट्स अॅप गृप साकारला गेला. यामध्ये पालीतील होतकरु व सामाजिक जाण असलेले सुज्ञ तरूण व नागरिक सहभागी झाले. विषेश म्हणजे हा ग्रूप राजकिय पक्ष विरहित असुन यामधील सदस्यांनी केवळ एक सुज्ञ व जाणकार नागरीक म्हणून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत हे नियम घालून दिले आहेत. कोणत्याही राजकीय नेते व पक्षाचा आधार न घेता पालीच्या विकासाला हातभार लावायला हे सदस्य सज्ज झाले अाहेत. ते असेच वेगवेगळ्या विषयात हात घालुन कामे मार्गी लावून गावाचा विकास साधणार आहेत.

रविवारी (ता. 14) या सदस्यांची पहिली बैठक देखिल यशस्वीपणे पार पडली. यावेळी पाली प्राथमिक अारोग्य केंद्राचा प्रश्न गंभीर असल्याचे निदर्शनास अाले. तसेच पाली येथे वर्षभरपूर्वी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारायचे उद्घाटन झाले पण तेथे रीकाम्या जागेशिवाय काहीच नाही! भुमीपुजन होऊन देखिल अजुन कोणतेच पाऊल उचलेल गेलेले नाही. याची माहिती घेण्यासाठी सर्व सदस्यांनी थेट येथील प्राथमिक अारोग्य केंद्र गाठले. तेथील वैद्यकिय अधिकार्यांना भेटून त्यांच्या व कर्मचार्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अौषध पुरवठा व रुग्णालयातील साधने पाहिली. त्यावेळी अनेक उपकरणे खराब झाल्याचे लक्षात आले. दवाखान्यातील उपकरणे गंजलेल्या अवस्थेत होती. रुग्णांची रुम व बेडची दुरवस्था झाली आहे. सोयीसुवीधा नीट नसल्याने सर्वसामान्य दवाखान्यात येतच नाहीत! अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे होणारी रुग्णांची व इतर कर्मचाऱ्यांची गैरसोय लक्षात घेतली. असा प्रकारे सोशल मिडीयाचा प्रभावी व विधायक वापर करुन ग्रामिण भागातील तरुण व नागरीक अापल्या गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांना सर्वच स्तरातून पाठिंबा व सहकार्य मिळत आहे.

 

Web Title: marathi news social media social work whats app group