बिनबुडाचं बोलणं खासदारांना शोभत नाही - तावडे

marathi news vinod tawde vinayak raut Refinery
marathi news vinod tawde vinayak raut Refinery

रत्नागिरी- खासदार विनायक राऊत यांनी प्रस्तावित नाणार रिफायनरीच्या जमीन खरेदीबाबत केलेले आरोप बिनबुडाचे असून जे कोणी लँड माफिया आहेत ते त्यांनी सिद्ध करावं असं आव्हान भाजपचे नेते आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. आज ते रत्नागिरीत शिक्षणाच्या वारी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. 

रिफायनरीवरून शिवसेना भाजप आमनेसामने आले आहेत. गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणार रिफायनरी प्रकल्पाचा घाट सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीत केला होता. यावरून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाणार कोणी जमिनी खरेदी केल्या आहेत ते काढावेत, त्यांचे सातबारे काढावेत.

सातबारा माफिया काय आहेत ते दाखवावेत, बिनबुडाचं बोलणं खासदारांना शोभत नाही. आणि जे कोणी लँड माफिया आहेत ते खासदारांनी सिद्ध करावं, आणि ते सिद्ध झालं तर आपोआप त्यांच्यावर कारवाई होईल. खासदरासारख्या जवाबदार व्यक्तीने लोकप्रियपेक्षा वास्तव विधान केलं तर लोक ते अधिक सिरियसली घेतात, असा टोलाही तावडे यांनी यावेळी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com