ग्रंथदिंडीने गुहागरमध्ये साहित्य संमेलनाला सुरवात (व्हिडिआे)

मयूरेश पाटणकर
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

गुहागर - महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा व ज्ञानरश्मी वाचनालय यांच्यावतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या  कोकण विभागीय साहित्य संमेलनाची सुरवात आज ग्रंथदिंडीने झाली. पारंपरिक वेषातील विद्यार्थी, चित्ररथ, झांजपथक, खालुचा बाजा आणि साहित्यप्रेमी नागरिकांची उपस्थिती हे ग्रंथदिंडीचे वैशिष्ट्य ठरले. 

शुक्रवारी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. उच्च व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर, गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय व तात्यासाहेब नातू माध्यमिक विद्यालय मार्गताम्हाने या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभुषा केली होती. जिल्हा परिषद शाळा असगोलीतील मुले कोळ्याच्या वेशभुषेत ग्रंथदिंडीत सहभागी झाली होती. व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ चिखलीच्या वारकर्‍यांनी वारीचे दर्शन घडवले.

पालशेत मधील झांजपथक, तळवलीतील खालुचा बाजा पथक, ढोलपथक, अंजनवेल व मार्गताम्हानेमधील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, गुहागर माध्यमिक विद्यालयातील एन. सी. सी. व एम. सी. सी. पथकाने पथसंचलन केले. तात्यासाहेब नातू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपग्रहासह बालसाहित्याचा केलेला चित्ररथ लक्ष वेधून घेत होता. 

तालुक्यातील 5 कलासंस्था व 10 शाळांमधील विद्यार्थी ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. साहित्यप्रेमींबरोबरच राजकीय क्षेत्रातील मंडळीही यामध्ये सहभाग घेतला. गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, भाजपचे गटनेते उमेश भोसले यांनी ढोल वाजविले. तर माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सावंत यांनी ग्रंथ पालखी खांद्यावर घेतली. 

Web Title: Marathi sahitya sammelan in Guhagar