सिंधुदुर्गनगरीमध्ये डाक अधीक्षक कार्यालयावर मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

सिंधुदुर्गनगरी - सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्या, कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी लागु कराव्यात यांसह विविध मागण्यांसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो डाकसेवक आज डाक अधीक्षक कार्यालयावर धडकले. अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या येथील शाखेतर्फे मोर्चा काढत शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. 

सिंधुदुर्गनगरी - सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्या, कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी लागु कराव्यात यांसह विविध मागण्यांसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो डाकसेवक आज डाक अधीक्षक कार्यालयावर धडकले. अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या येथील शाखेतर्फे मोर्चा काढत शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. 

पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, ग्रामीण डाक सेवक संघटनेचा विजय असो, आवाज दो हम सब एक है यांसह विविध घोषणा देत येथील परिसर दणाणून सोडला. शासन जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थित शेकडो डाक सेवकांनी केला. 

ग्रामीण डाक सेवक संघटना आपल्या न्याय मागण्यांसाठी 18 डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे सहाशे डाक सेवक कर्मचारी यात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून ग्रामीम डाक सेवक संघटनेचे अध्यक्ष संतोष हरयाण व सचिव जे. ए. मोडक यांच्या नेतृत्वाखाली आज सिडको बिल्डिंग ते अधीक्षक डाक कार्यालय असा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. यावेळी शेकडो कर्मचारी उपस्थित होते. 

केवळ आश्‍वासन देऊन कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास करत आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात जिल्ह्यात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला आणखीन धार यावी व शासनापर्यंत कर्मचाऱ्यांच्या आवाज पोचला पाहिजे, यासाठी आजचा मोर्चा काढला. 

या आहेत प्रमुख मागण्या - 

  • डॉ. कमलेशचंद्र समितीच्या सर्व शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून लागू करव्यात 
  • 12, 24 व 36 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना तीन पदोन्नती देवून अतिरिक्त वेतन वृद्धीचा लाभ द्यावा 
  • सातवा वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात 
  • पेंशन योजना लागु करावी 
  • कंत्राटी ग्रामीण डाक सेवकांना शासकीय सेवेत सामावून घ्या 
  • मर्यादित बदली सुविधांचा लाभ त्वरित लागू करावा. 

सरकार ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक नाही. केवळ आश्‍वासन देऊन कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास करत आहे. त्यामुळे या अन्यायाविरोधात 18 डिसेंबरपासून जिल्ह्यात बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत शासन स्तरावर डाक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही.
- संतोष हरयाण,
अध्यक्ष, ग्रामीम डाक सेवक संघटना  
 

Web Title: march on Post superintendent office in Sindhudurgnagari