विवाहात भेटीदाखल वृक्ष,पुस्तके,रक्‍तदान शिबिरही!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

२४ ला मुहूर्त - सुशांत मोरे-चैताली चव्हाणांचा अनोखा सोहळा

सावर्डे - सप्तपदीच्या फेऱ्यांनी सात जन्म एकत्र नांदण्यासाठी रेशीमगाठी मारून विवाह वेदीवर आनंदाने तरुण-तरुणी अडकतात. पर्यावरण व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देईल अशा पद्धतीने स्वत:चा विवाह करण्याचा निर्णय प्रा. सुशांत मोरे यांनी घेतला आहे. लग्नासाठी येणारे नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रपरिवाराला वृक्ष, पुस्तके भेट दिली जाणार आहेत. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना आवाहन करून तेथेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. हा सोहळा २४ जुलैला होणार आहे.

येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्रा. सुशांत मोरे यांनी विवाहातील पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन आधुनिक विचारांची कास धरली आहे. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील प्रा. मोरे नोकरीनिमित्ताने खरवते कृषी महाविद्यालयात रुजू झाले. धर्मनिरपेक्ष आणि अंधश्रद्धेला फाटा देणाऱ्या पद्धतीने स्वत:चे लग्न करण्याचा प्रा. मोरे यांचा मानस होता. विज्ञान शाखेची पदवीधर असलेली चैताली चव्हाण त्यांच्या विचारांशी सहमत झाली. दोघांनीही मांडलेल्या विवेकवादी विचाराला त्यांच्या कुटुंबीयांनी साथ दिली. त्यातून परंपरेला फाटा देऊन नावीन्य काय असावे याचा शोध सुरू झाला. लग्नामध्ये पारंपरिक पद्धतीने अक्षता न टाकता गुलाब पाकळ्यांचा वापर होणार आहे. लग्नासाठी येणारे नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट यांच्याकडून मिळणाऱ्या आहेराची रक्कम ते दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहेत. वऱ्हाडी मंडळींना विचारवंत, समाजसुधारकांची पुस्तके दिली जाणार आहेत. लग्नानंतर रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. नवदांपत्य लग्नाच्या स्वागत समारंभात १०० वृक्षांची लागवड करणार आहे. या अनोख्या विवाह सोहळ्याची तयारी कृषिमित्र एकता फाउंडेशन करीत आहे.

Web Title: Marriage got tree, books, blood donation camps!