पैशासाठी विवाहीतेचा छळ; पतीसह सासू-सासर्‍यां विरोधात गुन्हा दाखल 

अमित गवळे 
रविवार, 5 मे 2019

पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथील एका विवाहीत महिलेला सासरच्या लोकांनी पैशाची मागणी करीत शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात पाली पोलिस स्थानकांत तिच्या पती, सासू व सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथील एका विवाहीत महिलेला सासरच्या लोकांनी पैशाची मागणी करीत शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात पाली पोलिस स्थानकांत तिच्या पती, सासू व सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिला आपला पती प्रतिक थोरात, सासू विद्या थोरात व सासरे हिंदुराव थोरात यांच्यासमवेत आंबेवाडी (ता. रोहा) येथे राहत होत्या. या महिलेचा विवाह  प्तिक थोरात यांच्याशी 20 जुन 2018 ला झाला होता. त्यानंतर या विवाहीत महिलेकडून सासरच्या लोकांकडून पतीच्या व्यवसायाकरीता 10 लाख रुपयांची मागणी केली जात होती. तसेच त्यासाठी या महिलेचा मारहाण व दमदाटी करुन 
छळ केला जात होता. तसेच पिडीत महिलेला शारिरीक सुखापासून वंचीत ठेवले जात होते. ''पती प्रतिक याला व्यवसायाकरीता 10 लाख रुपये माहेरुन घेवून ये, मग तुला येथे यु.पी.एस.सी परिक्षेस बसण्यास देवू व तुला सुखाने नांदवू'' ,असे वारंवार बोलून ऑगस्ट 2018 ते 26 एप्रिल 2019 पर्यंत शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिलेने पाली पोलि्स स्थानकांत तक्रार दिली.

त्यानुसार पती प्रतिक थोरात (वय. 29), सासू विद्या थोरात (वय. 47), सासरे हिंदुराव थोरात (वय. 52) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. एन.एन.मोरे हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married woman persecution for money; filed a lawsuit against husband