हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे झाल्या ‘लेफ्टनंट’

martyred major kaustubh rane wife kanika rane joins indian army
martyred major kaustubh rane wife kanika rane joins indian army

सिंधुदुर्ग -  ऑगस्ट २०१८ मध्ये काश्मीरच्या गुरेझ भागात दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका या 'लेफ्टनंट' झाल्या आहेत. नऊ महिन्यांच्या खरतर प्रशिक्षणानंतर त्यांनी लेफ्टनंट पदाचे दोन 'स्टार्स' खांद्यावर चढवले आहे. 

ऑगस्ट २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरमधील बंदिपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर झालेल्या चकमकीत मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी कनिका यांनीदेखील लष्करी सेवेत जाण्याचा निर्धार केला होता. केवळ निर्धार करून त्या थांबल्या नाहीत तर, त्यांनी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा दिली. या परीक्षेत त्या मेरीटने पास झाल्या. त्यानंतर त्यांनी चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत (ओटीए) नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणानंतर शनिवारी त्या प्रत्यक्षात नेप्टनंट पदाचे दोन स्टार्स चढवले. 

मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानंतर त्यांच्या पश्चात कनिका आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा आहे. दुःखाला कवटाळून न बसता कनिका यांनी मोठ्या जिद्दीने लष्करी सेवेतच जाण्याचा निर्णय घेतला आणि शनिवारी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. राणे हे सिंधुदुर्ग मधील मीरा रोडचे रहिवासी होते. त्यांनी दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. परंतु, या चकमकीत त्यांच्यासह अजून दोन जवानांना वीरणरण आले होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com