कॅशलेस व्यवहाराच्या समर्थनार्थ वैभववाडीत तरुणांची भव्य रॅली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

वैभववाडी - केंद्र शासनाने घेतलेल्या कॅशलेस व्यवहाराला समर्थन आणि प्रचार प्रसिद्धीसाठी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातर्फे बाजारपेठेत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्याकरिता सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत तहसीलदार संतोष जाधव यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधताना व्यक्त केले.

काळा पैसा बाहेर काढणे आणि भ्रष्ट्राचाराला आळा घालण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय ८ नोंव्हेंबरला घेतला. या निर्णयाला समर्थन आणि विरोध दर्शविणारे पडसाद सर्वत्र उमटले. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर देशात कॅशलेस व्यवहारांची चर्चा सुरू झाली. या कॅशलेस व्यवहारांना तरुणाईने पसंती दिली आहे. दरम्यान, आज येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यानी कॅशलेस व्यवहाराच्या समर्थनार्थ बाजारपेठेत भव्य रॅली काढली. या वेळी कॅशलेस व्यवहार झालेच पाहिजे, कॅशलेस इकॉनॉमी झालीच पाहिजे, काळा पैसा बाहेर आलाच पाहिजे, भ्रष्ट्राचार थांबायला हवा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. रॅली महाविद्यालय ते अर्जुन रावराणे विद्यालय अशी काढली.

संभाजी चौकात या रॅलीत तहसीलदार संतोष जाधव, नायब तहसीलदार सागर कुलकर्णी, प्रा. सुरेश पाटील, संजीवनी पाटील, आर. डी. देसाई, आनंदा कांबळे आदी सहभागी झाले. या वेळी तहसीलदार श्री. जाधव यांनी मार्गदर्शन केले.

सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असून, या निर्णयामुळे काळापैसा बाहेर येणार आहे. सरकारने घेतलेल्या कॅशलेस व्यवहारामुळे भविष्यात भ्रष्ट्राचाराला आळा बसणार आहे. आपण सर्व तरुण-तरुणी या देशाचे आधारस्तंभ आहात. त्यामुळे सरकारचा हा निर्णय लोकांपर्यत पोहोचविणे, त्यांना कॅशलेस व्यवहाराची माहिती देणे आपली जबाबदारी आहे. या व्यवहार पद्धतीचा लोकांना फायदा होणार आहे.
- संतोष जाधव, तहसीलदार

Web Title: Massive youth rally in support of cashless transaction