esakal | रत्नागिरीतील कोकेन प्रकरणी मास्टर माइंडला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीतील कोकेन प्रकरणी मास्टर माइंडला अटक

रत्नागिरी - कोकेन या अमली पदार्थ तस्करी प्रकरणाची उकल करण्यात तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. याचा मास्टर माइंड आणि भारतीय हवाई दलाचा पंजाब येथील कर्मचारी मुकेश शेरान (रा.पंजाब) याच्यासह कोकेन देणारा अंकित सनबिर सिंग (वय 23 रा.राजस्थान) या दोघांच्या मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

रत्नागिरीतील कोकेन प्रकरणी मास्टर माइंडला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - कोकेन या अमली पदार्थ तस्करी प्रकरणाची उकल करण्यात तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. याचा मास्टर माइंड आणि भारतीय हवाई दलाचा पंजाब येथील कर्मचारी मुकेश शेरान (रा.पंजाब) याच्यासह कोकेन देणारा अंकित सनबिर सिंग (वय 23 रा.राजस्थान) या दोघांच्या मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिरीष सासणे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यानी ही कारवाई केली.

येथील एमआयडीसीमध्ये 20 जुलैला सायंकाळी पोलिसांनी कारवाई केली होती. एका पडक्‍या इमारतीत कोकेनचे डील होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सुमारे 50 लाख रुपये किमतीचे 936 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले होते. यावेळी कोस्टगार्डमधील अधिकारी रामचंद्र तुलीचंद मल्लीक, कर्मचारी सुनीलकुमार नरेंद्रकुमार रणवा या दोघांसह कोकेन घेऊन आलेला दिनेश शुभे सिंग या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. 

कोकेन घेऊन आलेल्या दिनेश सिंग, रामचंद्र मलिक या दोघांची चौकशी केल्यानंतर भारतीय हवाई दलातील एका कर्मचाऱ्याची रामचंद्र मलिक सोबत कोकेनचे डील झाले होते.  रत्नागिरीत कोकेनची विक्री करण्यासाठी दिनेश सिंग याच्याकडे 50 लाख रुपयाचे कोकेन पाठविण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते.

पुढील तपासासाठी ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके राजस्थान, पंजाब येथे गेली होती. कोकेनचा मास्टर माइंड मुकेश शेरान हा पंजाब येथे भारतीय हवाई दलात सेवेत आहे. त्याने राजस्थान येथील अंकित सिंग याच्यामार्फत दिनेशकडे कोकेन दिले होते. तर रामचंद्र व मुकेश यांचे फोनवर वारंवार बोलणे होत होते. त्यामुळे पोलिसांनी मुकेश शेरान याला पंजाब येथून तर अंकित सिंग याला राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे. 

अटकेची परवानगी न्यायालयाकडून

हवाई दलात सेवेत असलेल्या मुकेश याच्या अटकेची परवानगी स्थानिक न्यायालयाकडून देण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करून तेथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीनंतर मुकेशला रत्नागिरीत आणण्यात येणार आहे. तर अंकित सिंग याला घेऊन पोलिस पथक रत्नागिरीत दाखल झाले आहे. शुक्रवारी खेड येथील न्यायालयात त्याला हजर करण्यात आले.

loading image