माथेरान मिनी ट्रेनची सुरक्षा चाचणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

माथेरान - गेल्या 8 मेपासून बंद पडलेली माथेरानमधील मिनी ट्रेन सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सुरक्षा चाचणीसाठी सोमवारी दुपारी 2.15 वाजता नेरळहून सोडलेली विशेष गाडी माथेरानकडे रवाना झाली. आणखी दोन दिवस ही चाचणी चालणार आहे. मंगळवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे खास पथक त्यासाठी उपस्थित राहणार आहे.

मे 2016 मध्ये दोन वेळा मिनी ट्रेनचे डबे रुळावरून घसरल्यानेही अमन लॉज ते माथेरान शटल सेवा बंद करण्यात आली. माथेरानच्या पर्यटन आणि जनजीवनावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याशिवाय ही सेवा सुरू करणे शक्‍य नसल्याची ठाम भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली होती. या मार्गावर एअर ब्रेक प्रणाली असलेले इंजिन आणि डबे जोडलेली गाडी चालवावी, असा निष्कर्ष निघाल्यावर आता एअर ब्रेक प्रणालीची चाचणी सुरू आहे. लखनौ येथून आलेल्या विशेष पथकाच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी माथेरानच्या दिशेने रवाना झाली. तब्बल आठ महिने आणि वीस दिवसांनी नेरळ स्थानकातून माथेरानच्या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. रेल्वेच्या रिजनल डिझाइन सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या विशेष पथकाने या गाडीतून प्रवास केला. हे इंजिन एका विशेष संगणकीय प्रणालीला जोडण्यात आले होते.

यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने इंजिनाची क्षमता व एअर ब्रेक प्रणालीची परिपूर्ण चाचणी केली जात आहे. हे इंजिन 600 अश्‍वशक्तीचे आहे. महिनाभरापासून या मार्गाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. जेथे रेल्वे मार्ग व्यवस्थित आहे, तेथेपर्यंत ही गाडी नेण्यात येणार आहे.

Web Title: matheran mini train security test