माथेरान... प्लास्टिक गॉन!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

२६ जानेवारीपासून पूर्णत: बंदी; स्वच्छतेसाठी विशेष मोहीम

माथेरानचे निसर्गसौंदर्य जपण्यासाठी स्वच्छता मोहिमेसोबतच प्लास्टिकबंदीचे पाऊल टाकले जात आहे...

माथेरान - पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये नगरपालिकेतर्फे २६ जानेवारीपासून विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. प्लास्टिकमुळे होणारा कचरा व प्रदूषण लक्षात येता नगरपालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णत: बंदी आणली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप यांनी दिली.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर घातलेल्या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ५०० रुपये ते १ लाख रुपयांपर्यंत दंड वसूल करण्याची तरतूद ‘माथेरान नगरपालिक घनकचरा व साफसफाई उपविधी-२००४’मध्ये करण्यात आली आहे. 

मोटार वाहनांना बंदी असलेले माथेरान हे जगभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. लोकसंख्या कमी असली, तरी मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. यापूर्वी बायोगॅस प्रकल्पाची यशस्वी उभारणी करून कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा पथदर्शी प्रकल्प माथेरान नगरपालिकेने यशस्वी केला. शौचालय व्यवस्थापन आणि स्वच्छ शहर म्हणून माथेरानने संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियानात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करून अनेक पारितोषिके पटकावली. अलीकडे स्वच्छतेच्या आघाडीवर काहीशी शिथिलता आल्याने ती दूर करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न आहे. ‘स्वच्छ माथेरान’चा लौकिक कायम ठेवण्याचा, यामध्ये सातत्य ठेवण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. या दृष्टीने कचरा वाहतूक करणारे ठेकेदार व कर्मचाऱ्यांची बैठक १८ जानेवारीला घेण्यात आली. छोटे-मोठे व्यापारी, नागरिक; तसेच लॉजिंग व हॉटेल व्यावसायिकांची बैठकही २० जानेवारीला घेण्यात आली. या सर्वांना स्वच्छता मोहितेत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली. 

२६ जानेवारी रोजी माथेरानमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड केला जाईल.
- डॉ. सागर घोलप, मुख्याधिकारी, माथेरान नगरपालिका.

Web Title: matheran plastic gone