कोकणात मत्स्य दुष्काळाची का लागली चाहूल....? वाचा

Matil Wale Breaks In Ratnagiri Fishing Ratnagiri Kokan Marathi News
Matil Wale Breaks In Ratnagiri Fishing Ratnagiri Kokan Marathi News

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून सुटलेल्या मतईल वाऱ्यांनी मच्छीमारीला ‘ब्रेक’ लागला आहे. आधीच रिपोर्ट मिळत नसल्याने मत्स्यदुष्काळाची चाहूल लागली. त्यात थोड्याफार मिळणाऱ्या मासळीचा घासही निसर्गाकडून काढून घेतला जात आहे. ताशी १२ ते १५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काल (ता. २८) समुद्रात गेलेल्या नौका माघारी परतल्या.

यंदाच्या हंगामात मासेमारी व्यवसाय सर्वाधिक अडचणीत आला आहे. बदलत्या वातावरणाने मच्छीमारांना तोंड वर काढू दिलेले नाही. पर्ससिन मच्छिमारी ३१ डिसेंबरला बंद झाल्यानंतर ट्रॉलर्स्‌, फिशिंग, गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांना दिवस चांगले येतील, अशी स्थिती होती. पण मच्छीमारांचा हा अंदाज फोल ठरत आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत सात ते आठ वेळा वादळामुळे मासेमारी ठप्प झाली होती.

नौका पाण्याला करंट

जानेवारी महिन्यात थंडी सुरू झाल्यानंतर मासळी मिळेल अशी आशा होती. गेले महिनाभर समुद्रात नौका घेऊन गेलेल्यांना रिपोर्ट लागलेला नाही. काहींनी तर नौका बंदरात उभ्या करून ठेवल्या होत्या. तीच वेळ जानेवारी महिन्यातही मच्छीमार अनुभवत आहेत. बुधवारी (ता. २९) दुपारपासून जिल्ह्यात वेगवाने वारे वाहत आहेत. ताशी १२ किमी वेगाने वारे वाहत होते. गुरुवारी (ता. ३०) हा वेग वाढला असून १२ ते १५ किमी ताशी वेगाने वारे वाहत आहेत. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या नौका पाण्याला करंट असल्यामुळे माघारी परतल्या.

काही मच्छीमार समुद्रात ३० वावात गेले

मच्छी पकडण्यासाठी जाळे समुद्रात टाकल्यानंतर ते स्थिर राहत नव्हते. त्यामुळे मच्छीमारांनी नौका किनाऱ्यावर उभ्या करून ठेवल्या आहेत. मिरकरवाडा, काळबादेवी, कासारवेली, जयगड, हर्णै, राजापूरसह ठिकठिकाणच्या मच्छीमारांना वेगवान वाऱ्याचा फटका बसला आहे. मंगळवारी काही मच्छीमार समुद्रात ३० वावात गेले होते. त्यांच्या हाती मुबलक मासा लागलाच नाही. गिलनेटच्या बोटींना १० ते १५ किलो म्हाकुळ तर जाळीभर वेगवेगळे मासे लागले होते. ट्रॉलिंगलाही काहीअंशी म्हाकुळ मिळत आहे. त्याचा किलोचा दर २२० किलो रुपये आहे. पाहिजे तेवढा मासा मिळत नसल्याने खर्चही भागत नसल्याचे मच्छीमारांचे मत आहे. 

पारा घसरला
उत्तरेकडून वारे वाहू लागल्याने पुन्हा जिल्ह्यात थंडी जाणवू लागली आहे. मिनी महाबळेश्‍वरमध्ये पारा १०.५ अंशांपर्यंत खाली आला. रत्नागिरीत किमान १८.२, तर कमाल २८.६ अंश सेल्सिअस आहे. दापोलीतही १२ अंशांवर पारा आल्याने थंडीचा प्रभाव चांगलाच जाणवतो. थंडीचा अनुभव घेण्यासाठी परजिल्ह्यांतील अनेक पर्यटक कोकणातील किनाऱ्यांकडे येऊ लागले आहेत.

खर्च भागेना

दोन दिवसांपूर्वी कासारवेलीतील काही नौका समुद्रात गेल्या, त्यांना खर्च भागेल एवढाही मासा मिळाला नाही. त्यामुळे माघारी परतावे लागले.
- अभय लाकडे, मच्छीमार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com