अजब...! एकीकडे कोरोना; "येथे' मटक्‍याची लाखोंची उलाढाल

matka kokan sawantwadi taluka
matka kokan sawantwadi taluka

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - लॉकडाऊनमुळे बंद पडलेला मटक्‍याचा अवैद्य धंदा पुन्हा एकदा तेजीत सुरू झाला आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवस बंद असलेल्या टपऱ्यांवर आता मटका खेळणाऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा कडेकोट पोलिस बंदोबस्तात बंद आहे; मात्र असे असतानाही जिल्ह्यात अवैध धंदे जोरदार सुरू असुन गेले कित्येक दिवस बंद असलेल्या मटका धंद्यानेही आपले डोके वर काढले आहे. सावंतवाडी तालुक्‍याच्या विचार करता दारू, मटक्‍याचे प्रमाण येथे जास्त आहे. सध्या मटक्‍याची जिल्ह्यात रोज लाखोंची उलाढाल होत आहे. शहरातूनही याची सुत्रे हालतात.

जिल्ह्यातील गावागावात हे जाळे पसरले गेले आहे. एका कागदाच्या तुकड्यावर लाखो रुपयाची उलाढाल होत असते. युवा पिढीही या मायाजालात ओढली जात आहे. जिल्ह्यात लॉकडाउन काळात हा अवैध धंदा बंद होता; मात्र लॉकडाउन शिथिल होण्याआधीच याचे नेटवर्क सक्रीय झाले आहे. यात तालुक्‍यातील काहींनी या धंद्यात स्वतंत्रपणे बस्तान बसवल्याचीही चर्चा आहे. 

मटका बंद करण्याबरोबरच इतर अवैद्य धंद्यांवर कारवाईबाबत पोलिस निरीक्षकांना तत्काळ सुचना करतो. अवैद्य धंदे बंद व्हावेत ही भूमिका असून अशा प्रकारांवर जातीनिशी लक्ष घालतो. 
- शिवाजी मुळीक, पोलिस उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com