वेंगुर्लेत "नगराध्यक्ष आपल्या दारी' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

वेंगुर्ले - शहराच्या विकासासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात प्रत्येक महिन्यातून एकदा नगराध्यक्ष आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येईल व प्रभागातील समस्या त्याच ठिकाणी सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन येथील नूतन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी पत्रकारांशी बोलताना केले. 

नगराध्यक्षपदी भाजपचे श्री. गिरप हे निवडून आल्यानंतर आज त्यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला; मात्र शासनाकडून अद्यापही नगराध्यक्षांनी कार्यभार स्वीकारण्याचे पत्र उपलब्ध झाले नसल्याचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पत्रकारांना सांगितले. 

आज भाजपतर्फे शक्तिप्रदर्शन करीत व घोषणा देत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, युवा नेते संदेश पारकर, काका कुडाळकर, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, शहर अध्यक्ष ऍड. सुषमा प्रभुखानोलकर यांनी नगरपालिकेत प्रवेश करीत श्री. गिरप यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, मालवण भाजपचे बाबा मोंडकर, व्यापारी संघाचे विवेक खानोलकर, नागरी कृती समितीचे अतुल हुले, पालिका व्यायामशाळेचे व्यायामपटू, माजी तालुकाध्यक्ष साईप्रसाद नाईक, रवी शिरसाट, संदीप पाटील, बाळा सावंत यांच्यासह शहरातील व्यापारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक व गिरप यांचा मित्रपरिवार या सर्वांनी तसेच कॉंग्रेसचे नगरसेवक कृतिका कुबल, शीतल आंगचेकर, कृपा गिरप यांनीही श्री. गिरप यांचे अभिनंदन केले. तत्पूर्वी भाजपचे कार्यालय ते वेंगुर्ले नगरपरिषदेपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली. 

भाजपच्या व इतर सर्व नगरसेवकांना घेऊन शहराच्या विकासासाठी आपण कार्य करणार असून कोकणात आदर्श पालिका म्हणून वेंगुर्ले नगरपरिषदेचा नावलौकिक होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे श्री. गिरप यांनी सांगितले. 

पुढील लढाई उपनगराध्यक्षपदासाठी 
येथील पालिकेवर शिवसेना-भाजप युतीच्यावतीने श्री. गिरप हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले असले तरी पुढील लढाई उपनगराध्यक्षासाठी व स्वीकृत नगरसेवक पद मिळविण्यासाठी असून समविचारी शिवसेना पक्षाला व इतर नगरसेवकांना सोबत घेऊन ही लढाई जिंकणार, असे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सांगत शिवसेना-भाजपच्या जाहीरनाम्यात ज्या ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या त्या सर्व गोष्टी काटेकोरपणे अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. येथे भाजप पारदर्शक कारभार करेल, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: mayor dilip girap