कोकण रेल्वेने जाणार आहात मग हे जरूर वाचा

Mega Block On Konkan Railway Track On Friday Ratnagiri Marathi News
Mega Block On Konkan Railway Track On Friday Ratnagiri Marathi News

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील आडवली रेल्वे स्थानकात नवीन लूपलाईन टाकण्यासाठी शुक्रवारी (ता. 27) मध्यरात्री पावणेबारापासून दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेआठपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीमुळे निवसर ते विलवडे स्थानकांच्या दरम्यान आठ तास वाहतूक बंद राहणार आहे. त्याचा परिणाम आठ तासांच्या कालावधीत रत्नागिरी ते राजापूरमधून पुढे जाणाऱ्या दहा गाड्यांच्या वेळापत्रकावर होण्याची शक्‍यता आहे. 

कोकण रेल्वे मार्गाचे तत्काळ दुपदरीकरण शक्‍य नसल्यामुळे विविध स्थानकांवर गाड्यांचे क्रॉसिंग एकाचवेळी करण्याच्या दृष्टीने प्रशासन पावले उचलत आहे. आतापर्यंत रोहा ते ठोकूरपर्यंत अकरा स्थानकांवर नवीन लूपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. विलवडे ते निवसर या सुमारे 25 किलोमीटरच्या टप्प्यात रेल्वे क्रॉसिंगसाठी पुरेशी व्यवस्था नाही. दोन्हींमधील आडवली स्थानकात मुख्य लाईन आणि एक लूपलाईन आहे; परंतु एखादे इंजिन त्या ठिकाणी आले की, मुख्य लाईनच वाहतुकीसाठी खुली राहते.

नव्या लाईनमुळे एकाचवेळी गाड्या सोडणे शक्य

या स्थानकाची वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी कोरे प्रशासनाने दुसरी नवीन लूपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे अंतिम टप्प्यातील काम 27 डिसेंबरला करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी रात्री 23.45 पासून हा मार्ग बंद केला जाईल. हे काम सकाळी पावणेआठ वाजता संपेल, असा अंदाज आहे. त्यापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नवीन लाईनमुळे विलवडे आणि निवसर येथून एकाचवेळी गाड्या सोडणे शक्‍य होणार असून, दहा मिनिटांची वेळ कमी होणार आहे. 

दहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम शक्य

मेगाब्लॉकमुळे मुंबई - मंगलुरू एक्‍स्प्रेस, गांधीधाम - नागरकॉइल एक्‍स्प्रेस, कोचुवेली - डेहराडून एक्‍स्प्रेस, दादर सावंतवाडी तुतारी एक्‍स्प्रेस, एर्नाकुलम - हजरत निजामुद्दिन मंगला एक्‍स्प्रेस, एलटीटी - मडगाव डबलडेकर, कोचुवेली - इंदूर एक्‍स्प्रेस, मडगाव - रत्नागिरी आणि रत्नागिरी - मडगाव पॅसेंजर या दहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. 25 डिसेंबरपासून ख्रिसमसच्या सुट्या सुरु होत आहेत. तसेच नवीन वर्ष स्वागतासाठी पर्यटक कोकणात दाखल होतात.

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचा गोंधळ उडणार

त्याचदरम्यान आडवलीत घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचा गोंधळ उडणार आहे. हा गोंधळ उडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नियोजन सुरु आहे. सकाळी सुटणारी मुंबईतून येणारी दादर - रत्नागिरी पॅसेंजर रत्नागिरी स्थानकातच थांबवून ठेवली तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुटणाऱ्या गाडीवर परिणाम होणार नाही. अन्यथा सकाळी रत्नागिरीतून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या रागाला सामोरे जावे लागू शकते. 

रात्रीच्या वेळी दुरुस्ती 

कोरे मार्गावरील बहुतांश गाड्यांची वाहतूक दिवसा होते. रात्रीच्या वेळी कमी गाड्या धावतात. त्यात रत्नागिरी ते राजापूर दरम्यान रात्री धावणाऱ्या गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आडवली येथील काम रात्री करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com