पारकर समर्थकांनी महिलांवर फटाके टाकल्याचा मेघा गांगण यांचा आरोप 

पारकर समर्थकांनी महिलांवर फटाके टाकल्याचा मेघा गांगण यांचा आरोप 

कणकवली - पारकर समर्थकांनी कणकवलीत खालच्या पातळीवर राजकारण सुरू केले आहे. गणेशमूर्ती विसर्जन सोहळ्यात त्यांनी महिलांवरच फटाके टाकण्याचा पराक्रम दाखवला. या साऱ्याचे नेतृत्व पारकर बंधू करत आहेत, असा आरोप नगरसेविका मेघा गांगण यांनी केला. 

नगराध्यक्ष दालनात त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेविका कविता राणे, उर्वी जाधव, किशोर राणे उपस्थित होते.

सौ. गांगण म्हणाल्या, ""कणकवली नगरपंचायतीच्यावतीने शहरातील श्रीगणरायांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी भालचंद्र आश्रम रस्त्यावर मंडप घालण्यात आला होता. यात सायंकाळी साडेसहा नंतर पारकरांच्या गणेशमूर्तीची मिरवणूक सुरू असताना पारकरांच्या कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला.'' 

गांगण म्हणाल्या, ""पुष्पवृष्टीसाठी नगरपंचायतीने 15 फूट उंच मंडप घातला होता. तेथे आम्ही महिला नगरसेविका आणि शहरातील नागरिक उपस्थित होते; मात्र त्याची पर्वा न करता पारकर समर्थकांनी आमच्या अंगावर फटाके उडवले. यात छोटी मुलं घाबरून गेली होती. सुमारे अर्धातास हा प्रकार सुरू होता. पारकर यांच्या कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करून देखील त्यांनी फटाके फोडण्याचा प्रकार सुरूच ठेवला होता. पारकर बंधूच्या समोरच हा प्रकार सुरू असताना, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना रोखले नाही. त्यामुळे या साऱ्या प्रकारचे नेतृत्व पारकर बंधूच करत होते हे स्पष्ट होते.'' 

नलावडेंच्या अंगावर फटाके फोडून दाखवा 
गणेशमूर्ती विसर्जन सोहळ्यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या शुभेच्छा बॅनरवर पारकर समर्थक सातत्याने फटाके फोडत होते. ज्यावेळी समीर नलावडे कणकवलीत येतील तेव्हा पारकर समर्थकांनी त्यांच्या अंगावर फटाके फोडून दाखवावेत, बॅनरवर फटाके फोडून पळपुटेपणा दाखवू नका, असेही आव्हान मेघा गांगण यांनी दिले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com