MIDC मुख्य अभियंता सुधाकर वाघ यांची औद्योगिक क्षेत्राला भेट

लवकरच उद्योजकांसाठी भूखंड खुले होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
kokan
kokansakal

कळणे : एमआयडीसीचे (MIDC) मुख्य अभियंता सुधाकर वाघ (Sudhakar Wagh) यांनी आज आडाळी औद्योगिक (Industrial) क्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी पायाभूत सुविधा निर्मितीच्या कामांचा आढावा घेतला. 31 मार्चपूर्वी येथील सर्व कामे पूर्ण होतील. त्यापूर्वी लवकरच उद्योजकांसाठी भूखंड खुले होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भौगोलिक स्थितीमुळे रस्ते, वीज व पाणी पुरवठा आदी सुविधांची कामे करताना तसेच भूखंड आखताना काही तांत्रिक अडचणी दिसत आहेत. त्याबाबत प्रत्यक्ष भुरचनेला अनुसरून उपाययोजना करा, अशा सूचना श्री. वाघ यांनी अभियंत्यांना दिल्या. मुख्य अभियंत्यांच्या भेटीमुळे येथील कामाना गती मिळणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत आडाळी औद्योगिक क्षेत्र विकसित केले जात आहे. सुमारे सातशे एकर क्षेत्रात सध्या रस्ते, वीज, पाणी पुरवठा निर्मितीची कामे प्रगतीपथावर आहेत. कोरोना प्रादुर्भावमुळे उद्भवलेल्या लॉकडाउन मुळे कामाची गती मंदावली होती. अनेक उद्योजक येथे उद्योग सुरु करण्यास उत्सुक आहेत. तसेच केंद्रीय आयुष मंत्रालयच्या राष्ट्रीय वनौषधी संस्थेला येथील 50 एकर क्षेत्र राज्य शासनाने दिले आहे. त्यामुळे आता महामंडळाकडून येथील पायाभूत सुविधा निर्मितीच्या कामांना गती दिली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आज महामंडळाचे मुख्य अभियंता श्री. वाघ, अधीक्षक अभियंता वानखेडे यांनी आडाळी औद्योगिक क्षेत्रातील कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, उपभियंता अविनाश रेवणकर, डिप्युटी प्लानर, रुद्राणी इन्फ्रा चे प्रकल्प व्यवस्थापक मनोज खंडेलवाल, संचालक स्वानंद कुलकर्णी, आर. जी. कुलकर्णी आदीसह महामंडळाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

kokan
'तिघे एकत्र आल्यावर काय होते, हे पंढरपूरकरांनी दाखवून दिले!'

श्री. वाघ यांनी रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. यावेळी भौगोलिक संरचनेमुळे येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. पाण्याची साठवण टाकी व जॅकवेल चे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्याची पाहणी करून उर्वरित कामं डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याची सूचना श्री. वाघ यांनी केली. भूखंडाची आखणी करताना काही तांत्रिक त्रुटी राहिल्या आहेत. उंच सखल भागातील लहान भूखंडाऐवजी मोठ्या आकाराचे भूखंड बनवता येतील काय, याबाबत तातडीने अभ्यास करून निर्णय घ्या. इन्सुली येथून औद्योगिक क्षेत्राला वीज पुरवठा केला जाणार आहे. त्याचे कामं तातडीने होण्यासाठी नियोजन करावे.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून आडाळीतील कामासंबंधी आढावा घेतला जात आहे. लवकरच भूखंड देण्यास सुरुवात होणार असल्याने यद्धापातळीवर कामं पूर्ण करा, अशा सक्त सूचना श्री. वाघ यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना केल्या.

kokan
कोस्टल रोडचा अवघड टप्पा पूर्ण; दहा टक्के पार्किंग क्षमता वाढणार

31 मार्चपूर्वी कामं पूर्ण

सध्या औद्योगिक क्षेत्रातील साडेचार किमी चे रस्ते, पथदीप व पाणी पुरवठा आदी कामे पहिल्या टप्प्यात पूर्ण केले जाणार आहेत. उर्वरित रस्ते हे टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जातील. तसेच पाणी साठवण टाकी, मुख्य जलवाहिनी, जॅकवेल आदी कामे 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

भूखंड लवकरच खुले करणार

उद्योगमंत्री स्वतः आडाळी औद्योगिक क्षेत्राच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत. पायाभूत सुविधाची कामे बऱ्यापैकी मार्गी लागली आहेत. ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या तातडीने सोडवून येथील भूखंड उद्योजकांसाठी खुले करण्यात येतील, असे श्री. वाघ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com