रायगड - पाताळगंगा एमआयडीसीत मुख्य जलवाहिनी फुटली 

लक्ष्मण डूबे
शनिवार, 12 मे 2018

रसायनी (रायगड) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली. गळती होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने नागरिक एमआयडीसीच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहे. नागरिकांकडून गळती थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कैरे येथील एमआयडीसीच्या
जलशुध्दीकरण केंद्राच्या या मुख्य जलवाहिनी द्वारे कारखाने तसेच चावणा, जांभिवली, कराडे खुर्द या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. 

एमआयडीसीची ही जलवाहिनी फुटल्याने बिग कोला कंपनी जवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या गळतीमुळे दररोज भरपूर पाणी वाया जात आहे. पाण्याची नासाडी होत असल्याने एमआयडीसीच्या विरोधात कारखानदार आणि नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. पाईप लाईन मधुन गळती झालेल्या पाण्याचे उंच कारंजे उडत आहे. दरम्यान पाणी गळती रोखण्याबाबत एमआयडीसीने उपाययोजना करावी आशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: MIDC's main water pipeline leak