अबब ! पाण्याचा फवारा शंभर फुट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

वीज पुरवठा खंडित होऊन पुन्हा सुरू झाल्यामुळे पाण्याचा उच्चदाब निर्माण होऊन निवळी येथे ही मुख्य जलवाहिनी फुटली. सुमारे 100 फुट लांब पाण्याचा फवारा उडत होता. 

रत्नागिरी :  जिंदल कंपनीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी (पाईपलाईन) फुटल्याने सुमारे शंभर फुट उंच पाण्याचा फवारा उडत होता. निवळी येथील वृंदावन हॉटेलसमोर ही वाहिनी फुटली. पाण्याच्या अतिदाबामुळे ही वाहिनी फुटून सुमारे 150 क्‍युबिक मिटर पाणी वाया गेले. एमआयडीसीने तत्काळ पाणी पुरवठा खंडित करून दुरूस्तीचे काम हाती घेतले.

तालुक्‍यातील निवळी-बावनदीवरून जिंदल कंपनीला पाणी पुरवठा केला जातो. 600 एमएम व्यासाची ही जलवाहिनी आहे. सुमारे 40 किमी लांब हे पाणी नेले आहे. त्यासाठी साडेतिनशे अश्‍वशक्तीचा विद्युत पंप बसविण्यात आला आहे. वीज पुरवठा खंडित होऊन पुन्हा सुरू झाल्यामुळे पाण्याचा उच्चदाब निर्माण होऊन निवळी येथे ही मुख्य जलवाहिनी फुटली. सुमारे 100 फुट लांब पाण्याचा फवारा उडत होता. 

सुमारे 25 ते 26 वर्षांपूर्वीची वाहिनी
एमआयडीसीला याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ विद्युत पंप बंद केला. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे 25 ते 26 वर्षांपूर्वीची हा वाहिनी आहे. पाण्याच्या अतिदाबाने ती फुटली. दिवसभरात दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन शुक्रवारी  पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्‍यता आहे. 

अनेकांनी धुतली वाहने 
महामार्गालगत ही पाईपलाईन फुटल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी या पाण्याच्या फवाऱ्यामध्ये आपली वाहने धुऊन घेतली  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions Of Liters Of Water Are Wasted Due To The Erosion