दापोलीत ८२ दिवस किमान पारा १५ पेक्षा कमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

दापोली - गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी दापोलीत थंडीच्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत तब्बल ८२ दिवस किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिले. या वर्षी  ३ नोव्हेंबरपासून दापोलीचा पाऱ्याने १५ अंश सेल्सिअसच्या खाली यायला सुरवात केली होती.

दापोली - गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी दापोलीत थंडीच्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत तब्बल ८२ दिवस किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिले. या वर्षी  ३ नोव्हेंबरपासून दापोलीचा पाऱ्याने १५ अंश सेल्सिअसच्या खाली यायला सुरवात केली होती.

नोव्हेंबर महिन्यात पडणाऱ्या थंडीने आंबा काजू या मुख्य नगदी उत्पन्न देणाऱ्या फळपिकांच्या आर्थिक गणित अवलंबून असते. नोव्हेंबर महिन्यात दापोलीच्या किमान सरासरी तापमान १४ अंश सेल्सिअस होते. २०१५ च्या तुलनेत किमान तापमान सरासरी ५ अंश सेल्सिअसने कमी होते. गत पाच वर्षांच्या थंडीच्या कालावधीत या वर्षी नोव्हेंबर महिन्यातील २० दिवस दापोलीचा किमान  पारा ११ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिला. २०१२-१३ मध्ये ७ वेळा पारा ११ ते १५ अंशापर्यंत उतरला होता, तर २०१५-१६ मध्ये फक्त १ दिवस किमान तापमान १३ ते १४ अंश सेल्सिअस या दरम्यान नोंदले गेले होते. या थंडीच्या मोसमात डिसेंबर महिन्यात १८ वेळा दापोलीचे किमान तापमान ९ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. 

२०१३-१४ मध्ये १६ दिवस याच दरम्यान तापमानाची नोंद झाली. २०१४-१५ मध्ये १२ वेळा, तर २०१५-१६ मध्ये ८ वेळा किमान तापमान ९ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले गेले. याच महिन्यात १० वेळा तापमान ११ ते १२ अंशादरम्यान स्थिरावले, तर २०१५ मध्ये २ वेळा, २०१४ मध्ये ६ वेळा, २०१३ मध्ये ५ वेळा २०१२ मध्ये ४ वेळा तापमान ११ अंशापेक्षा जास्त आणि १२ अंशापेक्षा कमी होते. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात २८ दिवस किमान तापमान ९ ते १५ अंश या दरम्यान होते. यामध्ये ४ वेळा ९ ते १० अंश तर १२ वेळा १२ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान उतरले होते. यावर्षी जानेवारीत किमान पारा ९ अंश सेल्सिअसच्या खाली उतरला नाही; मात्र २०१५ मध्ये एकदा  तर २०१३ मध्ये ३ वेळा दापोलीचा पारा ९ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदला गेला होता. 

फेब्रुवारी महिन्यात किमान तापमान २४ वेळा १० ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले गेले, तर २०१६ मध्ये १६ वेळा, २०१५ मध्ये २७ दिवस तापमान ९ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले होते. थंडीच्या चार महिन्यांच्या  कालावधीत यावर्षी ४ वेळा किमान तापमान ९ ते १० अंश दरम्यान, ७ वेळा १० ते ११ दरम्यान आणि १७ वेळा ११ ते १२ अंश सेल्सिअसदरम्यान राहिले. गतवर्षी एकदा ८ ते ९ अंशादरम्यान ३ वेळा ९ ते १० अंश सेल्सिअस दरम्यान, तर ७ वेळा १० ते ११ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या पाच वर्षाच्या अभ्यासावरून दापोलीत थंडीच्या मोसमात यावर्षी सर्वात जास्त गारठा राहिला. यावर्षी ४३ दिवस किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावले होते. गतवर्षी आणि २०१२-१३ मध्ये  ३५ दिवस पारा १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिला. २०१४-१५ आणि २०१३-१४ मध्ये ३३ दिवस तापमान १० ते १२ अंशच्या दरम्यान होते.

Web Title: minimum temperature 15% in dapoli