कणकवली विधानसभेचा भाजपचा उमेदवार कोण ? 

कणकवली विधानसभेचा भाजपचा उमेदवार कोण ? 

कणकवली -  जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, युवा नेते संदेश पारकर व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यातील विधानसभेचा उमेदवार कोण असेल? याची माहिती नाही. पण कुणीही उमेदवार असला तरी त्यांच्या विजयासाठी आम्ही नक्‍की मेहनत घेऊ, असे आश्वासन मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. 

भाजपच्या स्वमालकीच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आज येथे झाले. या उद्‌घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, युवा नेते संदेश पारकर व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर एका बाजूला बसले होते. आगामी विधानसभेच्या निवडणूका विचारात घेऊन याकडे मंत्री केसरकर यांनी लक्ष वेधले. 

भाजप कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली - रवींद्र चव्हाण

केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपची सत्ता असणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांचीही जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या प्रत्येक समस्या तुम्हाला मार्गी लावायच्या आहेत. त्यासाठी कार्यकर्त्याने कार्यालयासाठीही वेळ द्यावा. तेथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्‍न सोडविण्यात हातभार द्यावा, असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले. 

याप्रसंगी आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, कोकण सिंचन पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर आदी उपस्थित होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत फक्‍त कणकवली येथेच पक्षाचे स्वमालकीचे कार्यालय निर्माण झाले आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनीही या कार्यालयास योगदान द्यायला हवे. यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी, भाजपच्या विस्तारासाठी या कार्यालयाची भूमिका महत्वाची राहील.

दरम्यान, कार्यालय निर्मितीबद्दल त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचे अभिनंदनही केले. आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनीही मनोगत मांडले. 

युती नसल्याने जिल्हा परिषद गेली 
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले. त्यामुळे विजय थोडक्‍यात निसटला अन्यथा जिल्हा परिषदेच्या 50 पैकी 42 जागा युतीचे उमेदवार सहज जिंकू शकले असते. आता पुढील निवडणूका युतीच्याच माध्यमातून लढवायच्या आहेत, असे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com