उधाण नुकसान भरपाई मिळणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मार्च 2019

मालवण - समुद्राच्या उधाणामुळे शेतपीकाचे किंवा शेतजमिनीचे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. आतापर्यंत अशा नुकसानीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नव्हती; मात्र खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी अशा प्रकरणी मदत देण्यासंदर्भात महिन्यापूर्वी केलेल्या मागणीला अनुसरुन मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय घेतला.

रावते व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश असलेल्या या उपसमितीने मदतीच्या निर्णयास तातडीने मान्यता दिली. यामुळे कोकण किनारपट्टीवरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन निर्णयानुसार आता समुद्राच्या उधाणामुळे कोरडवाहू क्षेत्राचे नुकसान झाल्यास प्रती हेक्‍टर ६ हजार ८०० रुपये, आश्‍वासित सिंचन असलेल्या क्षेत्राचे नुकसान झाल्यास १३ हजार ५०० रुपये तर बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्यास १८ हजार रुपये प्रती हेक्‍टर इतकी मदत मिळणार आहे. शेतपीकाचे ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाल्यास ही मदत मिळणार आहे. 

२ हेक्‍टरच्या मर्यादेत ही मदत मिळेल. याशिवाय समुद्राच्या उधाणामुळे खारे पाणी शेतजमिनीमध्ये घुसून शेतजमिनीचे कायमस्वरुपी नुकसान झाल्यास प्रती हेक्‍टर ३७ हजार ५०० रुपये इतकी मदत मिळणार आहे. ही नुकसान भरपाई २ हेक्‍टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Divakar Ravte comment