रोजगारासाठी नाणारला समर्थन द्या - रविंद्र चव्हाण

सावंतवाडी - कोनशी दाभिळ रस्त्याचे उद्‌घाटन करताना राज्यमंत्री रविंद्र चव्हाण. शेजारी राजन तेली, संदिप गावडे व अन्य. 
सावंतवाडी - कोनशी दाभिळ रस्त्याचे उद्‌घाटन करताना राज्यमंत्री रविंद्र चव्हाण. शेजारी राजन तेली, संदिप गावडे व अन्य. 

सावंतवाडी - ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. येथील लोकांना गावातच राहून रोजगार मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी देणाऱ्या नाणार प्रकल्पाला विरोध नको, असे आवाहन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले. 

तालुक्‍यातील कोनशी-दाभिळ या रस्त्याचे उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार राजन तेली, पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग, पंचायत समिती सदस्य संदिप गावडे, संदेश पारकर, सरपंच सुभाष सावंत, मंदार कल्याणकर, मनोज नाईक उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ""नुसता शहराचा विकास झाला म्हणून झाले नाही तर गावाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावातील रस्ते चांगले होणे गरजेचे आहे. हाच मुद्दा भाजपा सरकारकडुन पकडला असून, त्यानुसार काम सुरू आहे. मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून अनेक रस्ते तयार केले आहेत.'' 

ते म्हणाले, " ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्‍न आहे. दुसरीकडे रानटी जनावरांमुळे शेतीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावात राहून रोजगार हा प्रश्‍न आता जटील बनत आहे; मात्र नाणार सारख्या प्रकल्पामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांना विरोध नको.'' 

सदस्य संदिप गावडे यांनी नव्याने रस्ता झाल्यामुळे त्याचा फायदा लोकांना होणार असल्याचे सांगितले. गावातील प्रमुख लोकांचा सत्कार करण्यात आला. मिलींद मेस्त्री, शशिकांत घाडी, अश्‍विनी परब, दिना कशाळीकर, संचिता सावंत, रेश्‍मा गावकर, विनायक कोरगावकर, सुभाष सावंत आदी उपस्थित होते. 

अन्य पक्ष घेताहेत भाजपाच्या कामांचे श्रेय 
तेली म्हणाले, ""भाजपाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक रस्त्याची कामे झाली आहेत; परंतु त्या कामाचे उद्‌घाटन करण्याचे काम पालकमंत्री किंवा अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडुन होत आहे. हा प्रकार चुकीचा आहे. आमचे पालकमंत्री चव्हाण आहेत त्यांच्या माध्यमातून येथील कार्यकर्त्यांनी आपल्या भागाचा विकास करून घ्यावा.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com