जलवाहतुकीसाठी बंदरांच्या विकासातून रोजगार संधी 

जलवाहतुकीसाठी बंदरांच्या विकासातून रोजगार संधी 

रत्नागिरी - रत्नागिरीतून जाणाऱ्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 ची सिमेंटने बांधणी व चौपदरीकरण सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात 165 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. यातून जलवाहतूक सुरू करण्यासाठी गेल्या 5 वर्षात बंदरांचा विकास करण्यात येत आहे. दळवळणाची साधने व मार्ग वाढल्याने पर्यटन वाढून स्थानिकांना अधिक रोजगाराच्या संधी मिळतील, असे प्रतिपादन मंत्री रवींद्र वायकर यांनी केले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजवंदन सोहळा येथील पोलिस कवायत मैदानावर झाला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे उपस्थित होती. 

पूरग्रस्तांना तातडीची मदत आणि जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. अनेकांच्या घर व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून, वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडून निधी आणण्याचा प्रयत्न करू. गेल्या 5 वर्षांत जिल्ह्यात 12 हजारांहून अधिक हेक्‍टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले. 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यंदाच्या वर्षात 51 लाख रोपे लावल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. 

पूरग्रस्त भागात जनावरांसाठी एक घास 
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे कोल्हापूर, सांगली भागातील जनावरांसाठी 2 टन कोरडा चारा पाठविला आहे. या वाहनाला पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com