esakal | मिरकरवाड्यात नौकेला जलसमाधी; 3 खलाशींनी समुद्रात मारली उडी
sakal

बोलून बातमी शोधा

Mirkarwada

मिरकरवाड्यात नौकेला जलसमाधी; 3 खलाशींनी समुद्रात मारली उडी

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : मिरकरवाडा येथील ब्रेक वॉटर वॉलच्या टेट्रापॉडवर आदळुन मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाली. नौका बुडत असतानाच तीन खलाशींनी समुद्रात उडी मारून पोहत ते सुखरुप किनाऱ्यावर आले. मच्छीमारी नौका बंदरात नांगरण्यासाठी नेत असताना इंजिन अचानक बंद पडल्याने उधाणाच्या लाटांमध्ये सापडुन हि दुर्घटना घडली. यामध्ये नौका मालकाचे लाखोचे नुकसान झाले आहे.

मिरकरवाडा येथील आलिम होडेकर यांच्या मालकीची ही मच्छीमारी नौका होती. मासेमारी नंतर नौका मिरकरवाडा बंदरात नांगरण्यासाठी घेऊन जात होते. नौकेवर होडेकर यांच्यासह तीन खलाशी होत. पावसाचे वातावरण आणि आज आमावस्येमुळे समुद्राला चांगलेच उधाण होते. होडकर यांची नौका एका जेटीवरून मिरकरवाडा बंदरात ही नौकाखलाशी घेऊन जात होते. नौका फिरून मिरकरवाडा बंदारत जात असताना अचाकन इंजिन बंद पडले.

हेही वाचा: दैव बलवत्तर! 8 खलाशी सुखरूप, आंजर्ले खाडीत नौकेला जलसमाधी

लाटांच्या माऱ्यामुळे नौका आडवी झाली. त्यामुळे अधिकच लाटांचा तडाखा बसुल लागला. भरकटत नौका शेवटच्या ब्रेक वॉटरवॉवलपर्यंत आली. लाटांमुळे ती वारंवार टेट्रापॉडवर आदळु लागली. नौका फुटल्याने त्यामध्ये पाणी शिरु लागले.नौका बुडणार याचा अंदजा आल्यानंतर होडेकर यांच्यासह तिन्ही खलाशांनी समुद्रात उडी मारली. काही मिनिटे पोहत ते ब्रेक वॉटर वॉलपर्यंत आले. तेथून स्थानिक मच्छीमार त्यांच्या मदतीसाठी धावत आले. कस्टमचेअधिकारी देखील तेथे होते. मात्र कोणाचेही काही चालले नाही. सर्वांच्या डोळ्या देखत त्या नौकेला जलसमाधी मिळाली.

नौकेवरील क्रेड, जाळ्यासह सर्व साहित्य पाण्यात बुडाले. काही सामान पाण्यावर तरंगत पांढरा समुद्र किनारी लागले.खलाशांना हे साहित्य गोळा करण्यासाठी किनाऱ्यावर ठेवले होते. या दुर्घटनेत होडेकर यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. नौका लांटाबरोबर पांढरा समुद्र जवळ आल्याने ती बाहेर काढण्याच्यादृष्टीने होडेकर यांचा प्रयत्न आहे. मत्स्य विभागालायाची खबर देण्यात आली आहे.

loading image
go to top