मतदारांची दिशाभुल करुन विजय शिवतारे दोन वेळा आमदार - दिगंबर दुर्गाडे

durgade
durgade

वाल्हे - 'खोटे बोल, पण रेटून बोल' हे सुत्र वापरुन मतदारांची दिशाभुल करुन मंत्रीमहोदय दोन वेळा आमदार झाले आहेत. उठ-सुठ बारामतीवर टिका करुन मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. पराभव दिसू लागल्याने मंत्री महोदयांचा आता दिवाळीपुर्वीच शिमगा सुरू झाला असुन, तुमचे 'राख'चे भाषणच तुमची राजकिय राख करेल. असा घणाघाती टोला, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी लगावला.

राख (ता.पुरंदर) येथे नुकतेच झालेल्या कार्यक्रमादरम्यान राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या बेताल व्यक्तव्याचा प्रा. दुर्गाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे चांगलाच समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता व महिला खासदारांवर अर्वाच्य टीका करत असाल तर तुम्हाला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरू लागल्यानेच अशी बेताल बडबड सुरु झाली. खासदार सुप्रिया सुळेंचा वाढता जनसंपर्क, संसदेतील कारकिर्द, विकासाची भुमिका व माजी उपमुख्यमंत्री अजितदादांचा दरारा तुम्हाला खुपतोय का, बारामतीवर टिका करुन पुरंदरचा विकास होणार आहे का, 2009 ला राष्ट्रवादी व कॉग्रेस एकत्र असते तर तुमचे पार्सल दिसले असते का? असा सवाल करुन तुमची शिवराळ भाषाच तुमचे पतन घडवेल अशी चपराक देखील प्रा. दुर्गाडे यांनी लगावली. 

ते पुढे म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांपासून मंत्रीमहोदय बारामतीवर टिका करुन पुरंदरच्या विकासाची स्वप्नं तालुक्यातील जनतेला दाखवत आहेत. त्यातील किती पूर्ण केली हे त्यांनी सांगावे आणि मगच खासदार सुप्रियाताईंच्या कामाचा हिशोब मागावा. मंत्रीमहोदयांना स्वतःचा पराभव समोर दिसू लागल्याने आता दिवाळीपुर्वीच शिमगा सुरू झाला असुन, तुमचे 'राख' चे भाषणच तुमची राजकिय राख करेन., असा घणाघाती टोला, पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी लगावला.

खोटे बोल, पण रेटून बोल' हे सुत्र वापरुन मतदारांची दिशाभुल करुन मंत्रीमहोदय दोन वेळा आमदार झाले आहेत.उठ सुठ बारामतीवर टिका करुन मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.निवडणुकीची चाहुल लागताच मंत्रीमहोदय शिवराळ भाषेत टीका करत आहेत. शिक्षण, विकासकामे या मुद्द्यांवर ते बोलत नाहीत. तुमच्या उद्योजकतेचा तरूणांना 
काय फायदा करुन दिला.गेल्या वर्षात तालुक्याचा पाणीप्रश्न, रोजगाराचा प्रश्न मंत्र्यांना सोडविता आला नाही.निवडणुकीपुरती वेळ मारून नेणाऱ्या मंत्र्यांना जनता येत्या विधानसभेला जागा दाखवेल अशा विश्वासही प्रा.दुर्गाडे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातुन आणलेल्या निधीमुळे गावोगावी तालुक्याचा विकास केला आहे. हेच विरोधकांना पाहवत नसल्याने ते चुकीचे वक्तव्य करीत आहेत.मात्र हुशार जनता त्यांना जागा दाखवेल. पुरंदरची बारामती करण्याचे आश्वासन देऊन आपण निवडुन आलात या दोन पंचवार्षिक मध्ये एकतरी नवीन काम आणले आहे का. केंद्र व राज्यातील सत्ता शेतकरी विरोधात आहे. याचीजाणीव आता शेतकऱ्यांना होऊ लागली आहे.उसाला, दुधाला, शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे सामान्य माणुस पुरता भऱडला जात असल्याने राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, असे मतही प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.

पुरंदरला शिमगा नको दिवाळी हवी...
निवडणुकीला जागे होणारे मंत्रीमहोदय बारामतीवर टिका करुन आपली राजकीय पोळी भाजुन घेण्यासाठी शिवराळ भाषेत बडबड करीत आहेत. मंत्री महोदय, तुम्हाला यापुढे तुमच्याच भाषेत सडेतोड उत्तर देवू. आपणही ठाकरे घराणे व शिवसेनेच्या जीवावर उड्या मारताय अपक्ष लढुन स्वत:चे कर्तृत्व दाखवा, उगाचच बारामतीच्या नावाने बोटे मोडू नका, पुरंदरला दिवाळी हवी आहे शिमगा नको.
- प्रा.दिगंबर दुर्गाडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com