प्राजक्ताला ‘मिस सोनेरी महाराष्ट्र’ किताब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

चिपळूण - पुणे येथील सीझन्स मॉलमध्ये घेण्यात आलेल्या ‘सोनेरी महाराष्ट्र २०१८’ या सौंदर्य स्पर्धेत चिपळूणची कन्या प्राजक्ता भालचंद्र घाग हिने प्रथम क्रमांक मिळवला. प्राजक्ताने या स्पर्धेत बाजी मारल्याने तिने ‘मिस सोनेरी महाराष्ट्र २०१८’ चा किताब मिळाला.

मिस्टर व मिसेस अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत राज्यातील नामवंत स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी विविध ब्रॅण्डची नामांकनेही विजेत्यांना देण्यात आली. यामध्ये प्राजक्ताला एक वर्षाकरीता हेअर सोल्यूशन या नामांकित ब्रॅण्डचे ब्रॅण्ड ॲम्बॅसडर पद बहाल करण्यात आले. तिच्या या यशामुळे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.

Web Title: Miss Gold Maharashtra award tp Prajakta Ghag