‘मिस वेंगुर्ला २०१९‘ स्पर्धेत सावंतवाडीच्या हिने पटकावला प्रथम क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

वेंगुर्ला शहर बाजारपेठ मित्रमंडळातर्फे २९ ऑक्टोबरपासून वेंगुर्ला नगरपरिषद मार्केट येथे दिपावली शो टाईमला प्रारंभ झाला आहे. २९ रोजी फनी गेम्स तसेच रेकॉर्ड डान्स व ग्रुप डान्स पार पडले.

वेंगुर्ला - येथे झालेल्या ‘मिस वेंगुर्ला २०१९‘ या स्पर्धेत सावंतवाडीच्या भक्ती जामसंडेकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत ११ जणींनी सहभाग घेतला होता. 
वेंगुर्ला शहर बाजारपेठ मित्रमंडळातर्फे बुधवारी या स्पर्धा घेण्यात आल्या. 

वेंगुर्ला शहर बाजारपेठ मित्रमंडळातर्फे २९ ऑक्टोबरपासून वेंगुर्ला नगरपरिषद मार्केट येथे दिपावली शो टाईमला प्रारंभ झाला आहे. २९ रोजी फनी गेम्स तसेच रेकॉर्ड डान्स व ग्रुप डान्स पार पडले. बुधवारी ३० रोजी ‘मिस वेंगुर्ला स्पर्धा २०१९‘ ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला स्पर्धकांसह नागरीकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पाहा दिपोत्सवाने उजळलेले कुणकेश्वरचे मंदीर (व्हिडिओ) 

मिस वेंगुर्ला स्पर्धेचा निकाल असा - 

प्रथम क्रमांक - भक्ती जामसंडेकर (सावंतवाडी)

द्वितीय क्रमांक - पूजा राणे (रेडी)

तृतीय क्रमांक  - विद्या मादकाचे (सावंतवाडी)

या स्पर्धेत रिया केरकर (वेंगुर्ला), जान्हवी बागायतकर (बागायत) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.

वैयक्तिक बक्षिसांमध्ये बेस्ट स्माईल - गायत्री गावडे (कॅम्प-वेंगुर्ला), बेस्ट हेअर - चैताली बागायतकर (बागायत) आणि बेस्ट लुक म्हणून तृप्ती बोवलेकर (मठ) हिने पारितोषिक पटकाविले.

गवताचा भारा आणण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्कल (व्हिडिओ)  

प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ७००१, ५००१, ३००१ व उत्तेजनार्थ १००१ तर वैयक्तिक १०००  ची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. स्पर्धेचे परिक्षण अदिती दळवी आणि भूषण बाक्रे यांनी केले. सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.

भक्तीला माॅडेलिंगचा छंद 

प्रथम क्रमांक पटवलेली भक्ती ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तिला मॉडेलिंगचा छंद आहे. शिवाय ती एक उत्कृष्ठ नृत्यांगनाही आहे. जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सौंदर्यवती आणि डान्स स्पर्धांमध्ये ती नेहमीच भाग घेते. आजपर्यंत तिने अनेक 'किताब पटकावले आहेत. या तिच्या प्रवासात तिच्या आईचे तिला मोठे पाठबळ आहे.

पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून मेव्हणी, सासऱ्यावर चाकूने वार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miss Vengurla 2019 Competition Bhakti Jamsandekar First