तो गेला मुलाला शाळेत सोडायला आणि तो दिवस ठरला त्याच्या जिवनातला..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

मुलाला आंबोलीत शाळेमध्ये सोडायला आलेले गुजरात बडोदा येथील अंकित चव्हाण (वय ३७) यांचा मृतदेह अखेर राजापूर येथील रेल्वे बोगद्यात सापडला.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : मुलाला आंबोलीत शाळेमध्ये सोडायला आलेले गुजरात बडोदा येथील अंकित चव्हाण (वय ३७) यांचा मृतदेह अखेर राजापूर येथील रेल्वे बोगद्यात सापडला. ते गेल्या २ महिन्यांपासून बेपत्ता होते. रेल्वेतून तोल जाऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आंबोली येथील पब्लिक स्कूलमध्ये २६ जानेवारीला मुलाला सोडायला आलेले चव्हाण दोन महिन्यांपासून बेपत्ता होते. २८ जानेवारीला याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन येथील पोलिस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद होती. यातील बेपत्ता असलेले अंकित चव्हाण हे दोन दिवसांपूर्वी गुजरात -बडोदा येथून आंबोली येथील पब्लिक स्कूलमध्ये आठवीत शिकत असणाऱ्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आले होते.

हेही वाचा -आंबा, काजूसाठी स्वतंत्र बोर्ड ; विधिमंडळात या आमदाराची मागणी..

मृतदेह रेल्वे बोगद्यात आढळला

मुलाला शाळेत सोडल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला फोन करून तातडीने सोमवारी १२च्या ट्रेनमध्ये गुजरातला जाण्यासाठी बसणार असल्याची कल्पना दिली होती; मात्र ते उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांच्या पत्नीने वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र चव्हाण यांनी फोन उचलला नाही. आपले पती अंकित चव्हाण यांचा मोबाईल फोन चोरीस गेला असल्याची अंदाज वर्तवित त्यांनी आंबोली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक मोरे यांच्याशी संपर्क साधला.

हेही वाचा -येथे होते दररोज ९ ब्रास वाळूची चोरी ; केला जातो पुरावा नष्ट...

 शेवटच सोडल शाळेत 

त्यावर मोरे यांनी सकाळी १० वाजता मुलाला सोडून ते माघारी लगेच निघाले, अशी माहिती दिली. तरीही ते घरी परतले नाही. त्यामुळे सावंतवाडी पोलिस ठाण्यात भावोजी अभिजित बंडूराव चव्हाण यांनी सावंतवाडीत दाखल होत बेपत्ता असल्याची खबर दिली. आंबोली पोलिस बाबू तेली, राजेश गवस याबाबत तपास करत होते. आज एकाचा मृतदेह राजापूर येथील रेल्वे बोगद्यात सापडल्याची माहिती आंबोली पोलिसांना मिळाली. राजापूर येथील पोलिसांनी याबाबतची माहिती चव्हाण कुटुंबियांना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The missing father case in savantwadi kokan marathi news