राणेंना राजकारणात किंमत नसल्याने चर्चेत राहण्यासाठी वक्तव्ये

MLA Deepak Kesarkar Comments On MP Narayan Rane
MLA Deepak Kesarkar Comments On MP Narayan Rane

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग )  - नारायण राणे आपल्या संरक्षणासाठी ज्या पक्षात गेले त्या पक्षाची सत्ता गेली. त्यामुळे यापुढे त्यांच्यावर कारवाई झाल्यास ती सूडापोटी केली गेली असे त्यांनी बोलू नये. जिथे जिथे पुरावे आहेत तिथे कारवाई होणार, असा इशारा माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिला. राणेंना महाराष्ट्राच्या राजकारणात किंमत राहिली नाही म्हणून चर्चेत राहण्यासाठी ते वेगवेगळी वक्तव्य करत असल्याची टीकाही श्री केसरकर यांनी केले. 

येथील त्यांच्या निवासस्थानी महा विकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी आमदार पुष्पसेन सावंत, अण्णा केसरकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, डॉ. जयेंद्र परुळेकर, उदय भोसले, रुपेश राऊळ, दिलीप नार्वेकर, राजू मसुरकर, सुरेश गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

राणेंचे वेगवेगळे रूप अख्ख्या महाराष्ट्राला माहीत

नारायण राणे यांनी विद्यमान सरकारवर स्थगिती सरकार असा आरोप केला होता. या पार्श्‍वभूमीवर केसरकर म्हणाले, ""राणे हे वेगवेगळ्या रोलमध्ये दिसून येतात. त्यांचे वेगवेगळे रूप अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच किंमत राहिली नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळी वक्तव्य करून सर्वांचे लक्ष ते आपल्यावर वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.'' 

पुरावे हाती लागतील तिथे तिथे कारवाई

श्री केसरकर पुढे म्हणाले, ""श्री. राणे आपले रक्षण करण्यासाठी ज्या पक्षात गेले होते त्याची सत्ता गेल्याने ते आता उघडे पडले आहेत. सीआरझेडचे उल्लंघन करून कुठेकुठे बांधकामे झाली आहेत त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाल्यास ती सूडापोटी झाली असे त्यांनी यापुढे म्हणू नये. राणे यांच्याबाबतीत सर्व गोष्टी मला माहित आहेत. पुढे काय घडेल याची त्यांना भीती वाटू लागली आहे. जिथे जिथे पुरावे हाती लागतील तिथे तिथे कारवाई ही होणारच.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com