माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या प्रयत्नांना यश; आता `हा` रस्ता होणार चारपदरी

MLA Husnbanu Khalifa Demand Rajapur Sainagar Road Four Track Sanctioned
MLA Husnbanu Khalifa Demand Rajapur Sainagar Road Four Track Sanctioned

राजापूर ( रत्नागिरी ) - मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे शहरातील साईनगर पुनर्वसन भागातील काही घरांना होणारा धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

या भागामध्ये चौपदरीकरण करताना सहा पदरीऐवजी चार पदरी रस्ता करण्यात यावा. त्यात सर्व्हीस रोडचा समावेश असावा, अशी मागणी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी केली होती. त्याला महामार्ग प्रशासनाने मान्यता दिल्याचे खलिफे यांनी सांगितले. रस्त्याच्या सहा पदरीकरणामुळे या परिसरातील घरांना निर्माण होणारा संभाव्य धोका टळला आहे. 

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून शहरातील साईनगर पुनर्वसन भागातील काही घरे चौपदरीकरण कामात जाणार होती. या भागात सर्विस रोडसह सहापदरी रस्ता होणार असल्याने हॉटेल अंकितानजीक असलेल्या अनके घरांना धोका निर्माण होणार होता.

याबाबत तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जानेवारीमध्ये विधान परिषदेच्या माजी आमदार खलिफे, नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांच्या नेतृत्वाखाली साईनगर येथे येथील नागरिकांना आंदोलन केले होते. त्यानंतर रत्नागिरी येथील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चाही केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा केसीसी बिल्डकॉन कंपनी व साईनगर येथील नागरिकांसमवेत बैठक घेतली.

चौपदरीकरणाच्या कामाचे डिमार्केशन व ड्रॉईंग दाखवल्याशिवाय कामाला सुरवात करू नये, अशा सूचना खलिफे यांनी दिल्या होत्या. साईनगर येथील नागरिकांच्या घरांना चौपदरीकरणाच्या कामामुळे कोणताही धोका निर्माण होता कामा नये. सहापदरी रस्ता न करता चार पदरी रस्ता करण्यात यावा व त्यातच सर्व्हीस रोडचा समावेश असावा, अशी मागणी केली होती.

या साऱ्या मागण्यांना मान्यता मिळाली असून त्यामध्ये साईनगर येथील एकाही घराला चौपदरीकरणामध्ये धोका निर्माण होणार नाही. चारपदरी रस्ता तयार करण्यात येईल असे मान्य करण्यात आल्याची माहिती खलिफे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com