आकडेवारी पाहता विधानसभेत स्वाभिमानचे आमदार दिसतील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

कणकवली -""लोकसभेचा निकाल पाहून विधानसभेसाठी आम्हाला आशादायी चित्र आहे. कुडाळ विधानसभा मतदार संघात शिवसेना भाजप युतीला आठ हजाराचे तर सावंतवाडी मतदार संघात 27 हजाराचे मताधिक्‍य मिळाले आहे. ही आकडेवारी पाहता विधानसभेत महाराष्ट्र स्वाभिमानचे आमदार दिसतील, अशी आशा आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदत व्यक्त केली.

कणकवली -""लोकसभेचा निकाल पाहून विधानसभेसाठी आम्हाला आशादायी चित्र आहे. कुडाळ विधानसभा मतदार संघात शिवसेना भाजप युतीला आठ हजाराचे तर सावंतवाडी मतदार संघात 27 हजाराचे मताधिक्‍य मिळाले आहे. ही आकडेवारी पाहता विधानसभेत महाराष्ट्र स्वाभिमानचे आमदार दिसतील, अशी आशा आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदत व्यक्त केली.

श्री. राणे म्हणाले, "लोकशाहीमध्ये जय - पराजय होतो. गेल्या पाच वर्षात आम्ही जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, नगरपंचायत यात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एका पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आमदार विधानसभेसाठी निवडून आणू आणि आमची ताकद दाखवून देवू.''

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यात महाराष्ट्र स्वाभिमान या नव्या पक्षाला 2 लाख 75 हजार मते मिळाली ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची ताकद आहे; मात्र लोकशाहीत जनतेचा कौल किंवा जनतेचे म्हणजे मतपेटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले तो कौल आम्हाला मान्य आहे, असे मतही आमदार राणे यांनी  व्यक्त केले.

आमदार राणे म्हणाले, ""आम्ही जनतेने दिलेला कौल स्विकारतो; मात्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नवा होता. झेंडा नवा, निशाणी नवी, कोणतीही आघाडी, युती नाही, कोणत्याही पक्षाचे सहकार्य नाही तरीही आम्ही चांगली मते घेतली हा आमचा विजय आहे. ज्या वातावरणात आम्ही निवडणुका लढलो त्या वातावरणाचा विचार केला तर मतदारही सांगतील हा निकाल धक्कादायक आहे. खासदार म्हणून विनायक राऊत निवडून आले असले तरी जनतेच्या मनातील खासदार निलेश राणे आहेत. कार्यकर्त्यानी मेहनत घेतली, आम्ही प्रवाहाच्या विरोधात लढलो तरीही कणकवली विधानसभा मतदार संघात 10 हजार 357 चे मताधिक्‍य निलेश राणेंना मिळाले आहे. त्यामुळे मतदारांचे त्यांनी आभार मानले.''

शिवसेनेला भाजपने प्रामाणिक मदत केली
निवडणुकीपूर्वी भाजपने आपली नाराजी उघडउघड मांडली होती तो केवळ दिखावा होता. निकाल पाहता भाजपने शिवसेनेला प्रामाणिक मदत केली. यापुढे दाखविण्यासाठी दुश्‍मणी न दाखवता चांगली दोस्ती निभावावी; पण विधानसभेला शिवसेना - भाजपची युती होईलच असा आपल्याला विश्‍वास वाटत नाही असेही श्री. राणे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nitesh Rane comment