राणे म्हणाले, केसरकरांना साळगावकर यांच्यासारखा वारसदार का सोडून जातो

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

कणकवली - मंत्री दीपक केसरकर यांचे सगळ्यात जवळचे असलेले सहकारी बबन साळगावकर हे स्वतः जादूविषयी आरोप करत असतील तर तो आरोप नसून सत्य आहे. जनतेने त्यातून काय ते समजून घ्यावे. केसरकरांना साळगावकर यांच्यासारखा वारसदार का सोडून जातो. जवळचा माणूस अविश्‍वास का दाखवतो? हेही समजून घ्यावे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केले. 

ते म्हणाले, "" साळगावकर यांनी केसरकरांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत जे सत्य आहे ते जनतेसमोर आणले असून जनतेने त्याचा बोध घ्यावा. खरा माणूस कसा आहे, त्यांचे व्यक्तिमत्त्व साळगावकरांनी सांगितले. हा विषय राजकारणापलीकडचा आहे. अशी जादू जर होत असेल तर लोकशाहीवर कसा विश्‍वास ठेवावा? विकासकामे ही जादू टोण्याने होतील का, साळगावकर हे लहान नाहीत ते नगराध्यक्ष आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांचे स्वतःचे काही अंदाज आहेत. जवळचा माणूस अविश्‍वास का दाखवतो? हे नागरिकांनी समजून घ्यावे. 

मुख्यमंत्र्यांचे स्वागतच 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात येत आहेत, त्यांचे स्वागत करतो. विकासाबाबत जनतेशी ते संवाद साधणार आहेत. त्याचा आपणास आनंद आहे, असे मतही श्री. राणे यांनी आज मांडले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nitesh Rane comment on Deepak Kesarkar