अडीच तालुक्‍याचे मंत्री मुलाला आमदार करण्यासाठी प्रयत्नशील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

एक केंद्रीय मंत्री, एक पालकमंत्री व एक कॅबिनेट मंत्री यांनी केलेल्या विकासकामांमुळे दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला ५५ हजारांचे मताधिक्‍य मिळाले तर नवल ते काय. संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना व भाजप युतीच्या 
विरोधामध्ये जनमत आहे. त्यामुळे राज्यामध्ये आघाडीच्या जागांमध्ये निश्‍चितच वाढ होईल.

दाभोळ - दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या आम्हीच विकासकामांचा पाऊस पाडतो, असा भ्रम एक केंद्रीय व दोन राज्यातील मंत्री निर्माण करत असून जनतेने त्यांच्या भूलथापा ओळखल्या आहेत. ५५ हजारांचे मताधिक्‍य घेऊ म्हणणारे अडीच तालुक्‍याचे मंत्री सध्या मुलाला आमदार करायचे म्हणून या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. तरीही या मतदारसंघात सर्वात जास्त मताधिक्‍य हे काँग्रेस आघाडीलाच मिळेल. यामध्ये अन्य छुपे हातांची मदत असल्याचा दावा आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

कदम म्हणाले, एक केंद्रीय मंत्री, एक पालकमंत्री व एक कॅबिनेट मंत्री यांनी केलेल्या विकासकामांमुळे दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला ५५ हजारांचे मताधिक्‍य मिळाले तर नवल ते काय. संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना व भाजप युतीच्या 
विरोधामध्ये जनमत आहे. त्यामुळे राज्यामध्ये आघाडीच्या जागांमध्ये निश्‍चितच वाढ होईल. १९८९ साली मी सरपंच झाल्यापासून निकालाच्या आधी मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू केली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून वेगवेगळ्या तीन मतदारसंघातून मी निवडणूक लढून विजयी ठरलो व त्यावेळीही मी मिरवणूक काढली होती. आमदारकीला २०१४ मध्ये उभा राहिल्यानंतर मी मिरवणूक काढली व अशा प्रकारे मिरवणूक काढणारा राज्यातील मी एकमेव आमदार आहे. 

निकालाआधी मिरवणूक काढलेला खासदार
२०१९ च्या रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानानंतर आम्ही तातडीने मिरवणूक काढली असून आमचा खासदार हा निकालाआधी मिरवणूक काढलेला एकमेव खासदार असणार आहे. हे केवळ सातत्याने जनतेमध्ये संपर्कात राहिल्यामुळेच होते, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sanjay Kadam comment