'मनसे पुन्हा पालकमंत्री हटाव मोहिम आंदोलन राबवणार'

Parshuram Uparkar
Parshuram Uparkar

सावंतवाडी : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे नारायण राणे यांच्यानंतर मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहिम आंदोलन राबवणार आहे, असा इशारा मनसेचे कोकण प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, अमित इब्रामपुरकर, सुधीर राऊळ, राजू कासकर, अनिल केसरकर, ललिता नाईक, कृष्णा गावडे, ओंकार कुडतरकर ,गीता पाटेकर संकेत मयेकर आशिष सुभेदार आदी उपस्थित होते. 

यावेळी उपरकर म्हणाले जिल्ह्यात गेले काही दिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे काल येथील नरेंद्र डोंगरावर तेथील कुंड्या व बेंच मोडतोड करण्याचा प्रकार झाला होता हा सर्व प्रकार त्याठिकाणी परिसरात बसल्या जाणाऱ्या परप्रांतीयांकडून झाला याची अधिकृत माहिती व पुरावे आपल्याकडे आहेत नरेंद्र डोंगर परिसरात असलेल्या उद्यानात गांजा अफू आदी अमली पदार्थाचा मोठा वापर केला जातो. त्या ठिकाणी मटका जुगार खेळतो त्यातून परप्रांतीयांकडून हा प्रकार झाल्याची आमच्याकडे पुरावे आहेत त्यामुळे या प्रकारची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी आम्ही मनसे कडून करणार आहोत.

उपरकर पुढे होणारे जिल्ह्यात केवळ घोषणाबाजी करण्याचे काम पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर करत आहेत राज्यमंत्री असूनसुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैद्य धंदे दारू वाहतूक अमली पदार्थ जुगार मटका आदी गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केसरकर अपेशी ठरले आहेत राणे यांच्या काळात मनसेने त्यांच्या विरोधात पालकमंत्री हटाव असे आंदोलन केले होते आता त्याची पुनरावृत्ती मनसे करणार आहे केसरकर यांच्या विरोधात पालक मुंडे हटाव हे आंदोलन केले जाणार आहे लवकर जावयाची घोषणा होईल असे उपरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com