Loksabha 2019 : मोदी पंतप्रधान होणार हा विश्‍वास- सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

- नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार
- प्रचारानिमित्त 22 राज्यात फिरलो.
- लोकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा मोदींचे सरकार येणार
- केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांचा विश्‍वास

मालवण ः नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार ही आशा नाही तर विश्‍वास आहे. प्रचारानिमित्त 22 राज्यात फिरलो. या काळात लोकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा मोदींचे सरकार असणार आहे. असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्य तथा हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला.

प्रभू सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. प्रभू म्हणाले की, “पुढचे पंतप्रधान मोदीच असतील. गेल्या पाच वर्षात नव्या भारत निर्मितीचे जे मिशन सुरू केले ते आगामी कार्यकाळात पूर्ण करता येणार आहे. भारताला वैशिष्ट्यपूर्ण देश ठरवण्याचे स्वप्न साकारणार आहे. पूर्ण बहुमताचे सरकार सलग दुसर्‍यांदा बसवण्याचा बहुमान मिळणार आहे.”

पुढे बोलताना प्रभू म्हणाले की, “महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला मोठे यश मिळेल. मी प्रचारादरम्यान 22 राज्यांमध्ये फिरलो. दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सर्व स्तरातून, घटकातून हा प्रतिसाद मिळत होता. यावरून मोदी पंतप्रधान होणार हा विश्‍वास दृढ झाला आहे. या सगळ्या वाटचालीत अमित शहा यांची भुमिकाही महत्त्वाची होती. हे निकाल देशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.”


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi will again become the Prime Minister says Suresh Prabhu