मोडकाआगर पूल राजकीय कटाचा भाग !

Modkaagar Bridge Part Of Political Conspiracy Ratnagiri Marathi News
Modkaagar Bridge Part Of Political Conspiracy Ratnagiri Marathi News

गुहागर ( रत्नागिरी ) - गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने कसे पुरे होणार नाही यासाठी कोकणच्या विकासाच्या गप्पा मारणारेच प्रयत्न करत आहेत. मोडकाआगर पुलाचे काम रखडणे, गुहागर - शृंगारतळी रस्त्याची दुर्दशा दिसत असूनही डागडुजी न होणे, महामार्गाच्या जागेसाठी गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील संयुक्त मोजणी न होणे, जनतेला महामार्गाची माहिती होण्यासाठी ठरलेल्या बैठका रद्द होणे, या सर्व गोष्टी राजकीय कटाचा भाग आहेत. 

पावसाळ्याला जेमतेम दीड महिना शिल्लक असताना मोडकाआगर पुलाचे काम सुरु झाले. पर्यायी मार्गाकडे दुर्लक्ष केले. मे अखेर पूल पूर्ण करणार असे ठेकेदार सांगतो, परंतु काम पूर्ण झाले नाही तर गुहागर परिसरातील जनतेला साडेचार महिने आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. भाजप जिल्हाध्यक्षानी महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अडचणी सांगून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यास सांगितले. केंद्रीय वाहतूक मंत्र्यांना पत्रे लिहिली; मात्र केंद्रात त्यांचे सरकार असूनही दुर्लक्ष सुरू आहे. 

एका महिन्याच्या कालावधीत शृंगारतळी ते मार्गताम्हाने दरम्यानचे सुमारे 10 कि. मी. चे काम ठेकेदाराने गतीने पूर्ण केले. रामपूर ते चिपळूण दरम्यानचे काम पुढील टप्प्यात करायचे नियोजन असल्याने रस्त्याचे उत्कृष्ट डांबरीकरण केले; मात्र त्याच ठेकेदाराने गेल्या दोन वर्षात गुहागर शृंगारतळी दरम्यानचे डांबरीकरण केले नाही. गेल्या वर्षी गुहागर शृंगारतळी रस्ता डांबरीकरणासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते; मात्र या वर्षी शिवसेनेचा आमदार, मुख्यमंत्री असूनही शिवसैनिक ब्र देखील उच्चारत नाहीत.

शृंगारतळीत 18 मार्चला कोरोनाचा रुग्ण सापडला. तेव्हापासून तालुक्‍यातील व्यापार बंद आहे. पावसामुळे दिवाळीत आणि लॉकडाऊनमुळे मार्चपासून पर्यटन व्यवसायाला फटका बसला. आंबा, काजू, सुपारी बागायतदार विवंचनेत आहेत. अशा स्थितीत मोडकाआगर पुलाचे काम एप्रिल 2021 पर्यंत पुढे ढकलून चालले असते. मे महिन्यात लॉकडाऊन उठल्यानंतर व्यापार वाढला असता. डिसेंबर 2020 पर्यंत पर्यटनाला गती मिळाली असती; मात्र सुडाच्या राजकारणाने मोडकाआगर पुलाचा जुगार खेळला जात आहे. 

धरण रस्ता सुरु होणे कठीणच 
धरण रस्ता खुला झाला असता तर दुचाकी, छोट्या वाहनांची वाहतूक होऊ शकली असती; मात्र लांबलेला पाऊस आणि लॉकडाऊनमुळे कमी होणारा उपसा यामुळे धरणातील रस्त्यावरही आज 3 फुट पाणी आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत धरण रस्ताही खुला होणे कठीणच आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com