आमदार राणेंना त्रास देणे थांबबा - मोहिनी मडगावकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

सावंतवाडी - महामार्ग कामातील ठेकेदाराच्या गचाळ कामाचा त्रास महिलांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे चिखलफेकीची घटना योग्य आहे. पोलिसांनी जर आमदार नीतेश राणे यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास सर्व महिला एकत्र येऊन याबाबत आवाज उठवू व याला संपूर्ण पोलिस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा येथील स्वाभिमान पक्षाच्या महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी दिला. 

आमदार राणे यांनी महामार्गाच्या गचाळ कामासंदर्भात जे आंदोलन केले व त्यातून चिखलफेकीची घटना घडली ती योग्यच होती. त्याशिवाय या ठेकेदारांना व अभियंत्यांना जाग येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, ""आमदार राणे यांनी या महामार्गासंदर्भात विधानसभेतही प्रश्‍न उपस्थित केला होता; मात्र याकडेही दुर्लक्ष केले गेले. जनतेच्या प्रेमापोटी जाब विचारला व त्यातून निघालेल्या उत्स्फूर्त भावनेने चिखलफेकची घटना घडली. याचे विरोधकांनी फक्त राजकारण व विरोध करण्यापेक्षा जनतेला होणाऱ्या त्रासाचा विचार करून त्यांचे प्रश्‍न सोडवावेत. या महामार्गाची एवढी दुरवस्था झाली आहे की याचा महिला वर्गाला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी कोणतेही मार्गदर्शक फलक नसल्याने चुकायला होते. तर रात्रीच्या वेळी महिलांनी एकटे गाडी घेऊन घराबाहेर पडायलाही नको अशी परिस्थिती झाली आहे.

यामुळे आमदार राणे यांनी याबाबत आवाज उठवत केलेल्या आंदोलनाला महिलांनीही पाठिंबा द्यावा.'' ""पोलिस प्रशासनाकडून आमदार राणे यांच्यावर काही चुकीची कलमे लावली असून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. चिकलफेक प्रकरणात आमदार राणे व अन्य कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस कोठडीत ठेवले आहे. हे संपूर्णपणे चुकीचे आहे.'', असे त्यांनी नमूद केले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohini Madgaonkar comment