मोखाडा तालुका काँग्रेस अध्यक्ष पदी जमशिद शेख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

मोखाडा  : मोखाडा ब्लाॅक काॅग्रेस कमिटीचे पद मिळविण्यासाठी, मोखाड्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर मोखाडा शहर काँग्रेस चे माजी अध्यक्ष जमशिद शेख (लारा) यांनी बाजी मारली असून त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी आपली मोखाडा ब्लाॅक काॅग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याचे एका पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे. 

मोखाडा ब्लाॅक काॅग्रेस कमिटीचे पद गेली कित्येक महिण्यांपासुन वादात होते. ते मिळविण्यासाठी पक्षांतर्गतच स्पर्धा सुरू होती. अखेर जमशिद शेख यांनी त्यात बाजी मारली आहे. जमशिद शेख यांनी मोखाडा नगरपंचायत निवडणूकीत काॅग्रेसचे अस्तित्व जिवंत ठेवले आहे. तसेच पक्ष बांधणीसाठी ही विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्याची दखल घेऊन, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशान्वये आपली मोखाडा ब्लाॅक काॅग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे आपणास प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी आपणास कळविले असल्याचे सांगितले आहे. 

आपण या पदाला साजेशी कामगिरी करून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला भरघोस मते मिळवून देण्याबरोबरच पक्ष खेडोपाडी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेख यांनी सांगितले आहे. 

Web Title: Mokhda Taluka Congress President Jamshid Sheikh