बांद्यात आणखी मृत माकड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

बांदा - येथील सटमटवाडी परिसराबरोबरच आणखी काही भागात मृत माकड आढळल्याने भीतीमध्ये वाढ झाली आहे. कालच शहरानजीक असलेल्या पानवळ येथे एक मृत माकड सापडल्याचे वृत्त ताजे असतानाच येथील गडगेवाडी व सटमटवाडी येथे आणखी एक माकड मृत मिळाल्याची घटना उघड 
झाली आहे. 

माकडतापाच्या रुग्णांची संख्या आता दहावर पोचली आहे. काही दिवसांपूर्वी येथील सटमटवाडी व डिंगणे परिसरात मृत माकड आढळले. याबाबतची माहिती येथील ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती. मात्र याकडे काळजीपूर्वक न बघितल्याने माकडतापाचा फैलाव झाल्याचा आरोप होत आहे. यानंतर या भागात तापाचे रुग्ण आढळू लागले. बांदा येथील वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील यांनी रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता प्रथम तीन रुग्ण माकडताप पॉझिटिव्ह आले. यानंतर या तापाची साथ पसरतच राहिली. आता एकूण दहा रुग्ण सापडले आहेत. मात्र माकड मृत पावण्याचे प्रमाण वाढतच आहे. कालच पानवळ व गाळेल येथे मृत माकड मिळल्याचे वृत्त ताजे असताना येथील गडगेवाडी व सटमटवाडी येथे मृत माकड मिळाले. गडगेवाडी हे बांदा शहराला लागूनच असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

आरोग्य विभागातर्फे आवश्‍यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणी तापाने आजारी असल्यास त्याने तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल व्हावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे.

Web Title: monkey death in banda