सिंधुदुर्गः भालावलमध्ये माकडतापाचे दोन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

सावंतवाडी - डिंगणे येथे माकडतापाचे रुग्ण सापडण्याची घटना ताजी असतानाच भालावल येथे माकडतापाचे दोन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. माकडतापाचे निदान झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले आहे.

सावंतवाडी - डिंगणे येथे माकडतापाचे रुग्ण सापडण्याची घटना ताजी असतानाच भालावल येथे माकडतापाचे दोन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. माकडतापाचे निदान झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले आहे.

काजूचा हंगाम सुरू झाल्यामुळे ग्रामस्थ काजू गोळा करण्यासाठी रानात जातात. याच काळात माकडतापाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. जिल्ह्यात बांदा परिसरातील गावात माकडतापाची तीव्रता गेल्या तीन वर्षांत वाढली आहे. यंदा डिंगणे येथे माकडतापाचे रुग्ण सापडले होते. त्यात आता भालावल गावाचीही भर पडली आहे. गावतील एकाच कुटुंबातील दोघांची रक्ततपासणी केली असता ती केएफडी पॉझिटिव्ह आली आहे.

त्यांना तातडीने गोवा मेडिकल कॉलेज (बांबुळी) येथे उपचारासाठी पाठविले आहे. अर्चना वसंत सावंत (वय ५५) व रोशनी रोशन परब (वय ३९) अशी दोघांची नावे आहेत. त्यांना १८ मार्चला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सुरुवातीला ताप येत होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची रक्त तपासणी केली असता माकडतापाचे निदान झाले.

आरोग्य केंद्रात संपर्काचे आवाहन
गतवर्षी बांदा परिसरातील गावांमध्येच माकडतापाचे रुग्ण दगावले होते. ही परिस्थिती ओढवू नये, यासाठी गावामध्ये कोणालाही ताप येत असल्यास तो अंगावर न काढता त्यांनी लगेल जवळील आरोग्य केंद्रात किंवा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जावे, असे आवाहनही वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monkey fever patient in Bhalaval Sidhudurg

टॅग्स