दापोलीत वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या माकडाला जीवदान

चंद्रशेखर जोशी
शनिवार, 15 डिसेंबर 2018

दाभोळ - जालगाव येथील डॉ. नरेंद्र परदेशी यांनी वाहनाची ठोकर लागून रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका माकडाला जीवदान दिले आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. 

दाभोळ - जालगाव येथील डॉ. नरेंद्र परदेशी यांनी वाहनाची ठोकर लागून रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका माकडाला जीवदान दिले आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. 

याबाबत माहिती देताना डॉ. परदेशी म्हणाले की, आज सकाळी 8.20 वाजणेचे सुमारास मी माझ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी दापोली शहरातील महालक्ष्मी मंदिर मार्गाने जात असताना इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला एक माकड जखमी अवस्थेत पडलेले मला दिसले. त्याच्या भोवती जवळ राहणाऱ्या नागरिकांनी गर्दी केली होती. मी गाडीच्या खाली उतरलो व हे जखमी माकड पाहिले. या माकडाच्या डोक्‍याला जखम झाली होती. काही जणांनी त्याच्या डोक्‍याला हळद आणून लावली व प्रथमोपचार सुरू केले. तेवढ्‌यात माझी लहान मुलगी मला म्हणाली की या माकडाला आपण वाचविले पाहिजे. त्याला इथेच सोडायला नको. माझ्या मुलीचे वाक्‍य मला भावले. मुलीला शाळेत सोडून मी पुन्हा या जखमी माकडाजवळ आलो व तेथे असलेले अमोल मुंगेश व इतरांची मदत घेऊन मी माझ्याच गाडीतून त्याला उपचारासाठी दापोलीच्या पशुवैद्‌यकीय दवाखान्यात घेऊन आलो. तेथील डॉ. लोंढे व त्यांचे सहकार्यानी या माकडाला भूल देऊन त्याच्या डोक्‍याला जेथे जखम झाली होती. तेथे मलमपट्‌टी लावून उपचार केले.

उपचारानंतर ही माहिती वनविभागाला दिल्यावर वनविभागाच्या कर्मचारी येऊन या माकडाला त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. सध्या या जखमी माकडला पिंजऱ्यात ठेवण्यात आले असून तेथे ते आराम करत आहे. 

Web Title: Monkey injured in an accident