पावसाळ्याआधी पापड, कुरडया, सांडगे, लोणची करण्याची लगबग

अमित गवळे 
सोमवार, 4 जून 2018

पाली - भारतीय खाद्य संस्कृतीत विविध लज्जतद्दार पदार्थांना विषेश महत्व आहे. त्यातच पावसाळ्यातील बेगमीसाठी उन्हाळ्यात करण्यात येणाऱ्या विविध पदार्थ्यांची जंत्रीच सध्या बघायला मिळत आहे. उन्हाळ्यात बहुतांश घरात पापड, कुरडया, चिकोड्या, शेवया, फेण्या, सांडगे, लोणची व मसाले या विविध पदार्थांसह वाळवणाचे पदार्थ सामुहिक व वैयक्तिकपणे तयार केले जातात. आता हे सर्व पदार्थ रेडी झाल्याने पावसाळ्यातील लज्जतदार खाण्याची चिंता मिटली आहे.

जिल्ह्यात आजही अनेक घरांमध्ये ही वाळवण संस्कृती जोपासली जात आहे. पापड, कुरडया, चिकोड्या, मिरगुंड, फणस व आंबा पोळी, मसाले, सांडगी मिरची विविध सरबत आदि पदार्थ तयार करण्यासाठी गावागावतील महिला गोळा होतात. प्रत्येक महिलाआपल्या शेजारणीकडे हे सर्व पदार्थ बनविण्यासाठी विनाशुल्क आनंदाने जाते.  मग हे पदार्थ बनवितांना कधी गप्पां रंगतात, तर कधी गाणी गुणगूणली जातात. ज्या घरात हे पदार्थ बनविले जात असतात तिथे महिलांसाठी चहा-नाष्टा आदी दिले जाते. घरातील बच्चे कंपनी देखिल त्यांच्या मदतीला सज्ज असतात. तयार पापड,  कुरडया,  मिरगुंड, फणस व आंबा पोळी, सांडगी मिरची, लोणची, मसाले असे पदार्थ आप्तस्वकियांसह (नातेवाईक) शेजार्यांना देखिल हौसिने चवीसाठी दिले जातात. ही  परंपरा व संस्कृती अजुनही टिकून आहे. 

या बरोबरच अनेक घरांच्या अंगणात, पडवीत, छतावर, कौलावर किंवा पत्र्यावर कापलेल्या आंब्याच्या फोडी आंबोशी करण्यासाठी ठेवल्या जातात. त्याचबरोबर सुकी मच्छी तसेच कोकम सरबत बनविण्यासाठी बाटल्यांमध्ये कोकम ठेवले जाते. मसाल्यासाठी मिर्च्या येथेच सुकविल्या जातात. पापड, सांडगी, कुरड्या, चिकोड्या आदी येथेचे बनविले व वाळविले जातात. अशी ही पावसाळ्याची बेगमी व वाळवण संस्कृती अखंडीतपणे सुरु आहे.
 
Web Title: Before monsoon womans making padded, kurdai, sandge, pickle