आगरी गाण्याला अवघ्या ५ दिवसांत १ लाखांहून अधिक हिट्स

mogryachya-fula
mogryachya-fula

पाली - बोली भाषेतील गीतांना सध्या सुगीचे दिवस आलेले पहायला मिळत आहेत. आगरायन या कार्यक्रमाचे तरुण कवी सर्वेश तरे यांचे मोगऱ्याच्या फुला हे आगरी-मराठी बोलीतील गाणं काही दिवसांपुर्वी कृणाल म्युझीक ने युट्युबवर प्रसिध्द केल होते. अवघ्या पाच दिवसात या गाण्याने एक लाख हिट्सचा टप्पा पार केला आहे.

स्थानिक तरुण संगितकार, गीतकार आदि कलाकारांकडे उपजत कलाकौशल्ये असतांना सुद्धा केवळ पैसे आणि अपुरे मार्गदर्शन यामुळे कोणी या क्षेत्राकडे वळत नाही. मात्र सर्वेश तरे या तरुण कलाकाराने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या हिंमतीने हे शिवधनुष्य उचलेले आहे. तरुणाईचा कल हा ईग्रजी-हिंदी अन् पंजाबी गाण्याकडे जास्त आहे. मात्र परंतु, लोकगीतात खास करून आगरी-कोळीगीताला फक्त नाचण्यासाठीचं गृहीत धरले जाते. परंतु सर्वेश तरे यांनी गाण्यात तरुणाईला आवडेल असे प्रेमगीत लिहून त्याला साजेशी पटकथाही जोडली आहे. या गाण्याला आगरी गीतांचा विशिष्ट ठेका मात्र कायम ठेवला आहे. लोकगीताची जोडी अन थोडीसा पाश्चिमात्य संगीताचा वापर करून या गाण्याचे फ्युजन केले आहे. याच कारणास्तव गाण्याला तरुणाईने जोरदार प्रतिसाद दिला आहे.

‘मोगऱ्याच्या फुला’ या गीताची निर्मीती किरण रामकृष्ण पाटील यांनी केली असुन, संगीत संयोजन आणि गायन अनिमेष ठाकुर यांनी दिले आहे. अनिमेष ठाकुर यांचे या आधी ‘मंदा माई शिकलेली नव्हती का’ हे गाणं वायरल झाल असुन, युट्युबवर ४५ हजाराहुन जास्त लोकांनी ते पाहिले आहेत. ‘मोगऱ्याच्या फुला’ गाण्यात प्रमुख भूमिका सचिन पाटील यांनी आणि २०१६ ला झालेल्या मिस ठाणे स्पर्धेची विजेता श्रध्दा गायकवाड यांनी केली आहे.

सध्या गाण्यांच्या अल्बमची निर्मीती फारशी होत नाही. परंतू सिंगल ट्रॅक अल्बमचा बोलबाला युट्युबवर जोरदार चालु आहे. त्यातच जर लोकगीताकडे तरुणाईला वळवायचे असेल तर त्या विविध अभिनव प्रयोग व्हायला हवे असे या गाण्याचे गीत-संगीतकार सर्वेश तरे यांनी सकाळला सांगितले. पाच दिवसात या गाण्याला १ लाख हिट्स सोबत २१००हुन अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com