रत्नागिरीत आणखी 12 जणांना कोरोनाची लागण....

शुक्रवार, 29 मे 2020

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा गुरुवारी  दोनशेच्या पार गेला असून, एकूण रुग्ण संख्या २०८ झाली आहे. 

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा गुरुवारी  दोनशेच्या पार गेला असून, एकूण रुग्ण संख्या २०८ झाली आहे. 
गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात १२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये संगमेश्वर तालुक्यात चार जण त्यातील तिघेजण मेगी गावातले आहेत. चिपळूण तालुक्यातील दोन जण पॉझिटिव्ह असून दोघेही वाघिवरे गावांमधील रहिवासी आहेत. तर दापोली रत्नागिरी तालुक्यांमध्ये प्रत्येकी तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.आतापर्यंत ७६ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

दरम्यान, बुधवारी रात्री पॉझिटीव्ह सापडलेल्या १२ जणांमध्ये आमदार चालकाचा समावेश आहे. बुधवारी रात्री पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या बाराजणांपैकी ६ जण रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आहेत. जिल्ह्यात होम क्वारंटाईनची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. बुधवारी ही आकडेवारी ८९ हजार १२८ वर गेली होती.

हेही वाचा - ब्रेकिंग - सिंधुदुर्गात आणखी आठ जणांना कोरोनाची लागण....

जिल्ह्यात अद्याप २०३ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालयात ६४, कामथे उपजिल्हा रुग्णालयात ११, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे ११, गुहागर ग्रामीण रुग्णालयात ३, खेड तहसीलदार अंतर्गत ६३, रत्नागिरी तहसीलदार २९, संगमेश्वर तहसीलदार यांच्या अंतर्गत ४ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे