ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी 14 जणांना कोरोणाची लागण

रविवार, 31 मे 2020

जिल्ह्यातील मृतांची संख्या नऊ झाली आहे तर मिरज येथून आलेले चौदा अहवाल पॉझिटीव्ह आढळल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 270 वर पोचली आहे.

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू रविवारी (ता. 31) सकाळी झाला, तर अहवाल येण्यापूर्वी मृत झालेल्या दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या नऊ झाली आहे तर मिरज येथून आलेले चौदा अहवाल पॉझिटीव्ह आढळल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या 270 वर पोचली आहे.

मृतांची वाढती संख्या आणि बाधितांचे वाढते प्रमाण यामुळे आरोग्य यंत्रणेवर भार वाढू लागला आहे. 

रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत मिरज येथून 122 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 14 अहवाल पॉझिटिव्ह असून एका रुग्णाचा अहवाल तिसरा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 269 झाली आहे. त्यातील लांजा येथे तीन 3 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण अहवालापैकी 107 निगेटिव्ह आहेत. 1 अहवाल निष्कर्षविना होता. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रत्नागिरी 4, लांजा 3, गुहागर 3, कामथे 3, दापोली 1 रुग्ण यांचा समावेश आहे. त्यातील चार रुग्ण हे कोव्हीड केअर सेंटर रत्नागिरी येथे दाखल झाले होते.

हे पण वाचा - अखेर तोडगा निघाला; कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार रत्नागिरीतच होणार

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन रुग्णांचा दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल होताच मृत्यू झाला होता; मात्र मिरज येथून त्यांच्या तपासणीचे अहवाल आज प्राप्त झाले. ते पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात रविवारी सकाळी एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या नऊ झाली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असतानाच बरे झालेल्यांचेही प्रमाण चांगले आहे. आतापर्यंत 99 रुग्ण कोरानामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील 5,495 अहवाल निगेटिव्ह आले असून 13 नमुन्यांचे अहवाल अपुरे आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 158 आहे.

हे पण वाचा -  तंबाखूचे व्यसन सोडायचे आहे, मग ही बातमी नक्की बाचा! असे सुटू शकते तंबाखूचे व्यसन
 

 परजिल्ह्यातून आलेले नागरिक : 1 लाख 5 हजार 172

 परराज्यात गेलेल्यांची संख्या : 38 हजार 531
होम क्वारंटाईनखालील संख्या : 93 हजार 458